Thursday, October 22, 2026
Homeगडचिरोली१० जुलै रोजी उद्योजकांकरिता ‘इग्नाइट महाराष्ट्र’ कार्यशाळा…

१० जुलै रोजी उद्योजकांकरिता ‘इग्नाइट महाराष्ट्र’ कार्यशाळा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- व्यावसायिक व उद्योजक यांच्यामध्ये जागृती निर्माण होण्यासाठी उद्योग संचालनालयामार्फत IGNITE MAHARASHTRA -२०२४ (‘इग्नाइट महाराष्ट्र’) या कार्यशाळेचे आयोजन बुधवार दिनांक- १० जुलै २०२४ रोजी सकाळी ८ ते २ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा नियोजन सभागृह येथे करण्यात आले आहे.

सदर कार्यशाळेत जिल्ह्यातील उद्योजकीय कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे,राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करुन स्वयंरोजगाराच्या संधी मोठया प्रमाणात निर्माण करणे,एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम व निर्यातवृद्धीस चालना देण्यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. तरी या कार्यशाळेचा जिल्ह्यातील उद्योजकांनी अवश्य लाभ घ्यावा; असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र,गडचिरोली यांनी केले आहे.

तरी जिल्ह्यातील सुक्ष्म,लघु व मध्यम उपक्रम घटक निर्यातदार,निर्यातक्षम,उद्योजक,औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समुह,औद्योगिक वसाहती, शेतकरी व सहकारी संस्था आणि प्रक्रिया उत्पादक इत्यादींनी कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन महाव्यवस्थापक,जिल्हा उद्योग केंद्र गडचिरोली यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कराळे मास्तरांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये नागपूर पदवीधर मतदार...

दोन बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब; कोलकाता व ठाणे येथील कुटुंबीयांनी स्वीकारले पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विशेष दत्तक संस्थेच्या देखरेखीतील दोन बालकांना आज गुरुवारी हक्काचे कुटुंब आणि मायेची ऊब मिळाली.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दत्तक आदेशांवर स्वाक्षरी करून...

भारतीय वन सेवेतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय वन सेवेतील सन २०२४ च्या तुकडीतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना देण्यात आली आहे.या संदर्भात आज,गुरुवार २२ ऑक्टोंबर...

विधान परिषद निवडणूक; घरबसल्या मोबाईलवर तपासा तुमचे मतदार यादीतील नाव..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी होणार असून येत्या २७ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.त्यानुसार,मतदारांची नावे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!