Monday, August 31, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तहॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. - सर्वसामान्यांच्याच...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत तब्बल ९९३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.मात्र,घरगुती वापराच्या १४.२ किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.सध्या घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर ठेवण्यात आले असले तरी व्यावसायिक गॅसच्या दरवाढीचा अप्रत्यक्ष परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर होण्याची शक्यता आहे.व्यवसायिक गॅस महागल्याने हॉटेल,ढाबे,रेस्टॉरंट आणि कॅटरिंग सेवांचा खर्च वाढणार आहे.परिणामी, बाहेरचे जेवण,चहा-नाश्ता,थाळी यांचे दर दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय मिठाई दुकाने,बेकरी आणि लघुउद्योगांनाही फटका बसणार असून यामुळे उत्पादन खर्च वाढेल आणि हॉटेल व खाद्य व्यवसायातील वाढलेला खर्च शेवटी ग्राहकांकडूनच वसूल केला जाणार आहे.विशेष म्हणजे, अवघ्या एका महिन्यात जवळपास हजार रुपयांची वाढ झाली आहे.व्यवसायिक गॅस सिलेंडर मुंबईत कालपर्यंत २०३१.५० रुपये होता,तर आता ३०२४.५० रुपये झाला आहे.नागपुरात सिलेंडरची किंमत ३१२०.५० रुपये झाली आहे.या दरवाढीमुळे खाद्य व्यवसाय चालवणाऱ्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि त्याचा भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांनाच सोसावा लागणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!