- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राज्याची उपराजधानी तथा संत्रा नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूर येथील साहित्य विहार या संस्थेतर्फे दरवर्षी उत्कृष्ट वांड्.मय स्पर्धा घेण्यात येत असते व मराठी साहित्यिकांना त्यांच्या उत्कृष्ट साहित्य निर्मीतीसाठी ‘साहित्य विहार उत्कृष्ट वांड्.मय पुरस्काराने’ पुरस्कृत करण्यात येते व विजेत्या २५ साहित्यिकांना नामवंत साहित्यिकांचे हस्ते सन्मानित करण्यात येते.
महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात विशेष मानाचा समजल्या जाणाऱ्या या पुरस्काराकरीता नाट्यवाड्.मय प्रकारात यावर्षी झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या “महापूजा ” या महानाट्याची नाट्यलेखनाचे प्रथम पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
३० नोव्हेंबरला बाबुराव धनवटे सभागृह, वोक्हार्ट हॉस्पिटल, शंकर नगर, नागपूर येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात रायसोनी विद्यापीठ अमरावती चे कुलगुरू तथा प्रसिद्ध शिक्षणतज्ञ डॉ.विनायक देशपांडे आणि विदर्भ साहित्य संघ,नागपूरचे अध्यक्ष प्रदीप दाते यांचे हस्ते, साहित्य विहारच्या अध्यक्षा ज्येष्ठ बहुभाषिक साहित्यिक आशा पांडे यांच्या उपस्थितीत या वर्षातील दर्जेदार साहित्यिकांना सन्मानित करण्यात आले.त्यात झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनाही त्यांच्या ‘महापूजा अर्थात महासती सावित्री’ या नाटकाचे लेखनासाठी “साहित्य विहार उत्कृष्ट वाड्.मय पुरस्कार -२०२४” या पुरस्काराने सपत्नीक गौरविण्यात आले.या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी व विजेते साहित्यिक बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुजाता काळे यांनी तर सूत्रसंचालन संस्थेच्या सचीव व साहित्यिक मंदा खंडारे यांनी केले.
‘महापूजा’ हे संपूर्ण झाडीपट्टीतील गाजलेले महानाट्य असून झाडीपट्टीत या महानाट्याचे १०० च्या वर प्रयोग झालेले आहेत.विशेष म्हणजे याच दिवशी कोकणातील श्री काळेश्वर ग्राम विकास प्रतिष्ठान, आसू,ता.फलटण,जिल्हा- सातारा येथे ‘स्वदेशी भारत राज्यस्तरीय साहित्य संमेलन- २०२४’ मध्ये चुडाराम बल्हारपुरे यांच्या “धरती आबा क्रांतीसुर्य: बिरसा मुंडा” या नाटकासही” उत्कृष्ट साहित्य पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले.परंतू दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी असल्याने आसू येथील पुरस्कार चुडाराम बल्हारपुरे यांचे तर्फे कवी पी.डी.काटकर यांनी स्विकारले.
या निमित्ताने एकाच दिवशी दोन पुरस्काराने सन्मानित होण्याचा मान झाडीपट्टीस मिळाला आहे.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल पद्मश्री डॉ. परशुराम खुणे,प्रा.अरुण बुरे,योगेश गोहणे,प्रा.यादव गहाणे,प्रा.डॉ.श्याम मोहरकर,प्रा.डॉ.जनबंधू मेश्राम, प्रा.डॉ.योगीराज नगराळे,डॉ.राजकुमार मुसणे,डॉ. दिपक चौधरी,नाट्यश्रीचे दादा चुधरी,दिलीप मेश्राम, राजेंद्र जरुरकर, प्रा.नवनीत देशमुख (साहित्यिक), मधुश्री प्रकाशनचे प्रकाशक पराग लोणकर,साहित्यिक व कलावंतांनी अभिनंदन केले आहे.
- Advertisement -