Friday, September 18, 2026
Homeनागपूरसायबर चोरट्यांचा धुमाकूळ; एकाचा मोबाइल हॅक करून उडवले दोन लाख,तर दुसऱ्याला 'डिजिटल...

सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; एकाचा मोबाइल हॅक करून उडवले दोन लाख,तर दुसऱ्याला ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत उकळले साडेचार लाख..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सायबर चोरटे म्हणजेच ऑनलाईन फसवणूक करणारे अज्ञात चोरटे ‘या ना त्या’ मार्गाने सर्वसामान्य नागरिकांना जाळ्यात अडकवून फसवणूक करतात. अश्याच प्रकारे सायबर भामट्यांनी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून नागपूर शहरातील दोन वृद्धांना तब्बल साडे सहा लाख रुपयांचा गंडा घातला.
  • फेसबुक लिंकने केला घात👇
बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून सेवानिवृत्त झालेले ज्ञानेश्वर बापू ढोबळे वय ७० वर्षे,रा.रामेश्वरी रिंग रोड, कुकडे ले-आउट,नागपूर हे घरी मोबाईलवर सोशल मीडियाचे फेसबुक पाहत असतांनाच त्यांना बँक ऑफ इंडियाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ओळखपत्राची सुविधा देणारी लिंक दिसली.ही लिंक आपल्या बँकेशी संबंधित असल्याचे समजून त्यांनी त्यावर क्लिक केले.लिंकवर क्लिक करताच सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलचा ताबा मिळविला.त्यानंतर मोबाइलमधील बँकिंग तसेच यूपीआय सेवांवर नियंत्रण मिळवून त्यांच्या खात्यातून दोन लाख रुपयांचे अनधिकृत व्यवहार करण्यात आले. खात्यातून पैसे कमी झाल्याचे लक्षात येताच ढोबळे यांनी अजनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनीही भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
  • ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती👇
नागपूरच्या जयप्रकाशनगर,खामला परिसरातील विभुराम अपार्टमेंटमधील ६५ वर्षीय रहिवासी सुरेश भास्करराव पोहनकर यांना काही दिवसांपूर्वी  एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला.आपण मुंबई पोलिस मुख्यालयातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक ‘आकाश शर्मा’ असल्याचे सांगत त्याने पोहनकर यांच्या ओळखपत्रांचा गैरवापर करून एचडीएफसी बँकेत खाते उघडण्यात आल्याचे सांगितले. या खात्याचा वापर दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरविण्यासाठी झाल्याचे सांगून त्यांना घाबरविण्यात आले.त्यानंतर अन्य भामट्यांनी एनआयए अधिकारी असल्याचे भासवत व्हॉट्सॲपवर संपर्क साधला.अटक वॉरंटची भीती दाखवून पोहनकर यांना मानसिक दबावाखाली ठेवण्यात आले.खात्याची चौकशी आणि निर्दोषत्व सिद्ध करण्याच्या नावाखाली आरोपींनी त्यांच्याकडून साडे चार लाख रुपये आपल्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करून घेतले.फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोहनकर यांनी पोलिसांकडे धाव घेतली. सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात प्रकल्प लेखन कार्यशाळा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालय,देसाईगंज येथील वाणिज्य शाखेच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP-२०२० नुसार बी.कॉम.सेमिस्टर १,३...

‘राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया’ २०२६-२७’ अंतर्गत १० टन क्षमतेचे तेल काढणी युनिट,मिनी ऑईल मिल व गोदाम बांधकामासाठी अनुदान.. – ऑफलाइन आणि ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भुईमूग,करडई,इतर तेलबिया व इतर पिकांचे काढणी पश्चात होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर मूल्यवर्धनाला(Value Addition)चालना देण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे.केंद्र...

वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट; वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात आज,गुरुवार १७ सप्टेंबर रोजी काही भागात अचानकपणे वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावून वीज कोसळण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू...

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक आज,गुरुवार १७ सप्टेंबरला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!