ऑनलाईन डेस्क उद्रेक न्युज वृत्त
तामिळनाडू :-प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंधेला केंद्र सरकारकडून ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदा तामिळनाडू मधील साप पकडणाऱ्या दोघांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेले हे साप पकडणारे दोन्ही अवलिया तामिळनाडू मधील इरुला या आदिवासी जमातीतून येतात.मासी सदाइयान आणि वैदिवेल गोपाल अशी या दोघांची नावे आहेत. जेव्हा पुरस्कार घोषित झाल्याचा फोन या दोघांना आला तेव्हा हे दोघे साप पकडत होते. यांनी फोन उचलला आणि त्यांना सांगण्यात आले की तुम्हाला पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. तेव्हा या दोघांनी एक मिनिट थांबत दिर्घ श्वास घेतला, एकमेकांकडे पाहिले आणि गालातल्या गालात हसत पुन्हा साप पकडण्याच्या मागे लागले.
आदिवासी जमातीतील इरुला हे लोक तामिळनाडूच्या देनाकनिकोट्टईच्या जवळील जंगल परिसरात राहतात. त्यांना कन्नड भाषा सुद्धा चांगल्यापद्धतीने बोलता येते. हे लोक उंदीर आणि साप पकडण्यात अत्यंत कुशल आणि तरबेज आहेत.
२०१७ मध्ये अमेरिका अजगरांच्या त्रासाने वैतागली होती. अमेरिकेतील जंगलातील बर्मन जातीचे अजगरे पकडण्यासाठी अमेरिकेने थेट मासी सदाइयान आणि वैदिवेल गोपाल या जोडीलाच साद घातली. तेव्हा ही साप पकडणारी जोडी प्रथम प्रकाश झोतात आली होती.अजगर पकडण्यासाठी या दोघांना अमेरिकेने ४४ लाख रुपये दिले होते.