Tuesday, September 1, 2026
Homeगोंदियासात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या ३५ वर्षीय तरुणास १५ वर्षाचा सश्रम कारावास...

सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या ३५ वर्षीय तरुणास १५ वर्षाचा सश्रम कारावास…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या तरूणाला प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने आज,शुक्रवारी ३० ऑगस्टला दिलेल्या निकालात १५ वर्ष सश्रम कारावास व ९ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.नरेश भैय्यालाल जावळकर वय ३५ वर्षे रा.गोंदिया असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मागील ६ वर्षापूर्वी २८ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी १२ ते १ च्या सुमारास पिडीत चिमुरडी आरोपी नरेश जावळकर याच्या घरी फुल तोडण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपीने घरात कोणीच नसल्याचे पाहून चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला.दरम्यान, सायंकाळी या चिमुरडीने आपल्या आईला घडलेल्या घटनेबाबत सविस्तर सांगितले.यावरून पिडितेच्या आईने २९ ऑगस्ट २०१८ रोजी आरोपीच्या विरोधात गंगाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन विनायक यादव यांनी सविस्तर तपास करून आरोपीविरूद्ध विशेष न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते.या प्रकरणात आरोपीविरूद्ध दोष सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील कृष्णा डी. पारधी यांनी ७ साक्षदारांची साक्ष व इतर कागदोपत्री दस्तऐवज न्यायालयासामोर सादर केले.
एकंदरित आरोपीचे वकील व पिडितेतर्फे सरकारी वकील यांचे सविस्तर युक्तीवादानंतर प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश ए.टी.वानखेडे यांनी आरोपीविरूद्ध सरकारी पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून आरोपी नरेश जावळकर याला १५ वर्षाचा सश्रम कारावास व ९ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात पोलीस पैरवी कर्मचारी पोलीस हवालदार धीरज तिवारी यांनी काम पाहिले.
न्यायालयाने दिलेल्या निकालात सदर दंडाची रक्कम पिडित मुलीला देण्याचे आदेशित करण्यात आले असून सानुग्रह अनुदानाकरिता योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेशही न्यायालयाने पारित केले आहे
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!