Sunday, August 16, 2026
Homeगडचिरोलीसहपालकमंत्र्यांच्या हस्ते आरमोरीत ५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन..

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते आरमोरीत ५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल आज,गुरुवार १५ मे रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.त्यानुसार आज दुपारच्या सुमारास जयस्वाल यांचे आरमोरी शहरात आगमन झाले व अमृत योजना २.० अंतर्गत आरमोरी शहरातील पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन केले.प्रसंगी  पाणीपुरवठा योजनेचे काम गूणवत्तापूर्ण व दर्जेदार करून पाइपलाईन टाकण्यासाठी खोदलेले रस्ते त्वरित पूर्वस्थितीत करण्याचे व त्यामुळे नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही,याची दक्षता घेण्याची सूचना जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी केल्या.अमृत योजना २.० अंतर्गत आरमोरी शहर पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.प्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम,तहसीलदार उषा चौधरी, अशोक नेते,कृष्णा गजबे,महेंद्र ब्राम्हणवाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
५७ कोटी रुपयांच्या या पाणीपुरवठा योजनेतून ९१ किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकून घराघरात शुद्ध नळाचे पाणी पोहोचविण्यात येणार आहे.आरमोरी शहरातील प्रत्येक कुटुंबाला याचा थेट लाभ मिळेल, असे जयस्वाल यांनी नमूद केले.
वेगवान प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र यावे👇
सामान्य माणसाच्या अडचणी सोडवून आरमोरीसह संपूर्ण जिल्ह्याचा सर्वांगीण विकास जलद गतीने साधायचा असेल,तर सर्व जनप्रतिनिधी,प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन समन्वयाने काम केले पाहिजे,असे मत ॲड.आशिष जयस्वाल यांनी मांडले.
धावणारे पाणी हळू चालवायला, चालणारे पाणी थांबवायला आणि थांबलेले पाणी जिरवायला शिका, असा पाणी वाचविण्याचा असाही संदेश त्यांनी दिला.
आमदार रामदास मसराम,अशोक नेते,कृष्णा गजबे यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी सलामे यांनी प्रास्ताविकातून अमृत पाणीपुरवठा योजनेची माहिती दिली.कार्यक्रमाला नगरपरिषद,महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केवळ इमारती,दुरुस्ती आणि भौतिक सुविधा निर्माण करणे अंतिम उद्दिष्ट नसून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे गरजेचे-शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर – ‘आदर्श’ व ‘पीएम श्री’...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र व राज्य शासनाकडून शाळांच्या पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा वेळेत व उद्देशानुरूप विनियोग झाला...

आदर्श शाळांची संख्या वाढविण्यासोबतच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यावर भर-राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एकेकाळी मागास आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गडचिरोलीची ओळख आता वेगाने बदलत असून संपूर्ण देशाचे लक्ष या जिल्ह्याकडे वेधले जात...

तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडच्या बड्या कलाकारांना दणका..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बॉलिवूड सिनेसृष्टीतील तीन बड्या कलाकारांना मोठा दणका दिला आहे.नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या पान...

पोलीस विभागात खळबळ; सहाय्यक पोलिस निरीक्षकाने संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाने(एपीआय) पीसीएमटीच्या शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!