Thursday, July 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसर्जरीची पदवी नसतांनाही करीत होते ऑपरेशन….चार जण अटकेत; मेडिकल सेंटर की मृत्यूचे...

सर्जरीची पदवी नसतांनाही करीत होते ऑपरेशन….चार जण अटकेत; मेडिकल सेंटर की मृत्यूचे माहेरघर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- राजधानी दिल्लीतील उच्चभ्रू वसाहत ग्रेटर कैलास मध्ये एका नामांकित मेडिकल सेंटरमधील डॉक्टर सर्जरीची कुठलीही पदवी नसतानाही रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणी पित्त मूत्राशय किंवा इतर कोणत्याही आजाराच्या उपचारासाठी लोक येत असत; परंतु ऑपरेशनमुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला. अनेक मृत्यूनंतर ही फसवणूक उघडकीस आली.या मेडिकल सेंटरचे प्रमुख,त्यांची पत्नी,आणखी एक एमबीबीएस डॉक्टर यांच्यासह चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

डॉ.नीरज अग्रवाल,त्यांची पत्नी पूजा,डॉ.जसप्रीत आणि महेंद्र अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.आठवडाभरापूर्वी रुग्णाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी मेडिकल सेंटरमध्ये एकच गोंधळ घातला होता. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.पोलिस घटनास्थळी आले.यादरम्यान लोकांनी सांगितले की,एका रुग्णाला येथे दाखल केले.तेव्हा सर्जरी करण्यात आली.त्यात त्याचा मृत्यू झाला.

डॉ.जसप्रीत एमएस आहेत,परंतु या मेडिकल  सेंटरमध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांच्या ऑपरेशनमध्ये त्यांचा सहभाग नव्हता.परंतु त्यांच्याकडे सही केलेले कागदपत्र होते.म्हणजे ऑपरेशन इतर लोकांनी केले होते.कागदांवर सही डॉ.जसप्रीत यांची होती. दरम्यान,या मेडिकल सेंटरचे मुख्य डॉक्टर नीरज यांनी सर्जन म्हणून आतापर्यंत अनेक सर्जरी केल्या आहेत. या मेडिकल सेंटरविरोधात ग्रेटर कैलास पोलिस ठाण्यात तक्रारी आल्या होत्या.

अटकेतील चार आरोपींपैकी महेंद्र दिल्लीतील एका मोठ्या रुग्णालयात काम करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरकडे लॅब टेक्निशियन म्हणून कामाला होता.डॉक्टरांना सर्जरी करताना पाहून तो सर्जरी करण्याचे काम शिकला.त्यानंतर त्याने एमबीबीएसची बनावट डिग्री तयार केली आणि मेडिकल सेंटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. सेंटर व्यवस्थापन सर्जरीसाठी महेंद्रला कॉल करून बोलावून घेत असे.दरम्यान, महेंद्रने ही बनावट पदवी कोठून मिळवली आणि तिच्या आधारे तो लोकांवर कुठे उपचार करत होता; याचा तपास पोलिस करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात आज,गुरुवार ३० जुलै रोजी सकाळच्या...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे २५ मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकतेच दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या  प्रादेशिक हवामान खात्याने गडचिरोली जिल्ह्यासाठी काल,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट,तर आज गुरुवारसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार,जिल्ह्याच्या...

लाखो रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त; कार ठेवून पळाला आरोपी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करण्यात आला.दरम्यान,चालकाने पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला खरी,पण त्याचा प्रयत्न...

ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी; …अन्यथा एसटी बसची मिळणारी सवलत होणार बंद..!

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड(NCMC)अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार,येत्या शनिवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!