Thursday, October 15, 2026
Homeगडचिरोलीसंभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग सज्ज.. - "पाणी...

संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग सज्ज.. – “पाणी अडवा,पाणी जिरवा”चे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता गृहीत धरून गडचिरोली जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग सज्ज झाला आहे.उपलब्ध जलस्रोतांची साठवणूक क्षमता वाढविणे, पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी उंचावणे या उद्देशाने जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्धपातळीवर राबविल्या जात आहेत.
  • पाणीसाठा वाढीसाठी थेट उपाययोजना👇
उपलब्ध जलसाठ्यांचे संवर्धन करण्यासाठी विभागातर्फे विविध कामे हाती घेण्यात आली आहेत.यामध्ये अस्तित्वातील सिमेंट नाला बांध,कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि साठवण बंधाऱ्यांमध्ये वेळेत फळ्या टाकून पाणी अडविणे,तलावांमधील गाळ काढून साठवणूक क्षमता पूर्ववत करणे,नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करणे तसेच भूजल पुनर्भरणासाठी गावांमध्ये जल शोषखड्डे तयार करण्याच्या कामांचा समावेश आहे.
  • ‘माथा ते पायथा’ पाणलोट विकास कामांना गती👇
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-२.० आणि जलयुक्त शिवार अभियान-२.० अंतर्गत जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी ‘माथा ते पायथा’ या तत्त्वावर कामे केली जात आहेत.वनराई बंधारे,समतल चर,सलग समतल चर,बांधबंदिस्ती,माती नाला बांध आणि मोठ्या प्रमाणावरील वृक्षलागवडीद्वारे मृद व जलसंधारणाला गती दिली जात आहे.
  • नवीन कामांपेक्षा दुरुस्तीला प्राधान्य👇
जिल्हा वार्षिक योजना(सर्वसाधारण/आदिवासी)आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठान(DMFT)निधीतून मोठ्या नवीन प्रकल्पांऐवजी लहान स्वरूपाची जलसंधारण कामे आणि अस्तित्वातील जलस्रोतांच्या दुरुस्तीवर अधिक भर दिला जात आहे.कमी पर्जन्यमानाच्या शक्यतेनुसार संबंधित गावांसाठी आवश्यक कामांचे नियोजनबद्ध आराखडे तयार करण्यात येत आहेत.
  • “पाणी अडवा,पाणी जिरवा”चे आवाहन👇
संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी पाण्याचा अपव्यय टाळणे अत्यंत गरजेचे आहे. “पावसाचे पाणी अडवा,पाणी जिरवा” या तत्त्वाचा अवलंब करून प्रत्येक गावाने आपल्या परिसरातील जलसंधारण कामांतून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा,असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता सावन जयस्वाल यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाचन संस्कृतीच्या चळवळीत महात्मा गांधी शाळेचा पुढाकार.. – आज ‘ग्रंथालय आपल्या दारी’ उपक्रमाचा दिमाखात शुभारंभ; वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून ज्ञानसमृद्ध,वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली आणि स्पर्धा परीक्षांसाठी सज्ज अशी पिढी घडविण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक...

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी सण-उत्सव,नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तसेच संभाव्य आंदोलने व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!