Monday, August 17, 2026
Homeगडचिरोलीशेतकऱ्यांना सुधारित धान बियाणांचे वाटप..

शेतकऱ्यांना सुधारित धान बियाणांचे वाटप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-भारतीय कृषी अनुसंधान परिषद,केंद्रीय कापूस संशोधन संस्था,नागपूर आणि डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला संलग्न कृषी विज्ञान केंद्र,सोनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी शेतकरी प्रशिक्षण व सुधारित धान बियाणे वितरण कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला.यावेळी चांदाळा,तुकुम, गिरोला व कन्हाळगाव येथील अनुसूचित जमाती समूहातील ३० शेतकऱ्यांना सुधारित धान बियाण्यांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील कार्यकारी परिषद सदस्य शिवरामची घोडके,केंद्रीय कापूस संशोधन संस्था,नागपूरचे डॉ.दिपक नगराळे(समन्वय अधिकारी व वरिष्ठ शास्त्रज्ञ-वनस्पती रोगशास्त्र),डॉ.सुहास करकुटे(वरिष्ठ शास्त्रज्ञ) तसेच कृषी विज्ञान केंद्र,सोनापूरचे डॉ.किशोर की. झाडे(वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख),डॉ.प्रितम एन.चिरडे (विषय विशेषज्ञ-कृषिविद्या),डॉ.विक्रम कदम(विषय विशेषज्ञ-पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र),सुचित के.लाकडे (विषय विशेषज्ञ-उद्यानविद्या)आणि स्नेहा वेलादी (विषय विशेषज्ञ-कृषी अभियांत्रिकी)उपस्थित होते.
यावेळी शिवरामची घोडके यांनी नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देत शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे आवाहन केले.डॉ.दिपक नगराळे यांनी अनुसूचित जमाती विकास कृती आराखडा योजनेची माहिती देत शाश्वत पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.डॉ.सुहास करकुटे यांनी धान पिकातील किड व्यवस्थापन,डॉ.किशोर की.झाडे यांनी खरीप पीक नियोजन व हवामानाधारित तंत्रज्ञान,डॉ.विक्रम कदम यांनी पशुपालन व जनावरांच्या लसीकरणाचे महत्त्व, डॉ.प्रितम एन.चिरडे यांनी धान लागवड तंत्रज्ञान व हिरवळीच्या खताचा वापर,तर सुचित के.लाकडे यांनी भाजीपाला व फळपिक लागवडीबाबत मार्गदर्शन केले.स्नेहा वेलादी यांनी कृषी यांत्रिकीकरणाविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंकुश ठाकरे व शशिकांत सलामे यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुचित के.लाकडे यांनी केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

सावधान..! ऑनलाईन गेमिंगचा नाद ठरू शकतो जीवघेणा.. – गेमिंगमध्ये पैसे गमावल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुणाने घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-आजच्या घडीला जवळपास ९९ टक्के लोकांकडे स्मार्टफोन असल्याने यातील अनेकजण चालता-बोलता कनेक्ट होण्यासह पैसे कमावण्याचे मार्ग शोधतांना दिसून येतात.त्यातच,काहीजण पैसे कमाविण्याचा सोपा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!