Wednesday, June 24, 2026
Homeगडचिरोलीशिवसेना पक्ष नेत्या नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा... -गडचिरोली...

शिवसेना पक्ष नेत्या नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा… -गडचिरोली संपर्कप्रमुख वर्षा मोरे यांच्या कडून शुभेच्छांचा वर्षाव…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-विधान परिषदेच्या आमदार ते कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळालेल्या शिवसेनेच्या पहिल्या महिला नेत्या पेशाने डॉक्टर असलेल्या नीलम गोऱ्हे यांची ओळख शिवसेनेतील फायर ब्रॅण्ड नेत्या अशी आहे.सर्वसामान्य महिलांच्या हाकेला धावून जाणाऱ्या नीलम गोऱ्हे ताई अशी त्यांची ओळख आहे. सर्वसामान्य महिलांसाठी सतत कार्यरत असतात. तसेच त्या अनेक सामाजिक संस्थांद्वारे महिलांसाठी कार्य करतात.मी गडचिरोली जिल्ह्याचा संपर्क दौरा करताना प्रत्येक दौऱ्याचे डिटेल्स नीलम ताई स्वतः माझ्याकडून घेतात.गडचिरोली जिल्ह्यातील छोट्या छोट्या गावांबद्दल जाणून घेण्यामध्ये नीलम ताईंना फार आवड असते आणि प्रत्येकाची सखोल चौकशी करतात एवढी चिकित्सक त्यांची वृत्ती आहे . सर्वसामान्य आदिवासींपर्यंत सर्व महिलांच्या योजना पोहोचल्या की नाही; याची सखोल चौकशी त्या करत असतात.महिला आणि दलितांच्या प्रश्नासह अनेक मुद्द्यांवरून त्यांनी रोखठोक भूमिका घेतली.महिला आघाडीची तोफ नीलम गोऱ्हे यांनी कायम धडाडत ठेवली.
महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याकरता नीलम गोऱ्हे यांनी १९७७ साली युवक क्रांती दलातून सामाजिक क्षेत्रात काम करायला सुरुवात केली.परंतु,त्यांनी त्यांची चौकट केवळ महिला चळवळीपुरती मर्यादित ठेवली नाही.ऊसतोडणी कामगार,शोषित,मजूर, भूमीहीन दलित,मजुरांसाठीही त्यांनी चळवळ उभारली.ज्या काळात राजकारणात पुरुषी वातावरण होते; त्या काळात नीलम गोऱ्हे यांनी आपली राजकीय कारकिर्द जोमाने सुरू केली.त्यांनी लक्ष वेधलेल्या महिलांच्या प्रश्नांमुळे राजकारणाच्या पटलावर नवा अजेंडा निर्माण होत होता.महिलांचे प्रश्न सोडवण्याकरता समाजकारणासह राजकारणही गरजेचे असल्याचे त्यांना कळले,म्हणून त्यांनी आपली राजकीय वाटचालही सुरू केली.महिलांचे प्रश्न, दलितांच्या समस्या सोडवण्याकरता त्यांनी १९८७ साली रिपब्लिकन पक्षाला पाठिंबा दिला.राज्याच्या राजकारणात नीलम गोऱ्हेंचा झंझावात वाढत गेला. प्रखर महत्त्वाकांक्षा असलेले निडर व्यक्तिमत्त्व नीलम गोऱ्हेंच्या रुपाने मिळत होते.त्यातूनच,त्यांनी पुढे शिवसेनेची वाट निवडली.शिवसेनेतील महिला आघाडी ला नीलम गोऱ्हेंनी मजबूत केली.बाळासाहेब ठाकरेंच्या काळातील शिवसेना अशीच निडर आणि आक्रमक होती.त्यामुळे नीलम गोऱ्हेंच्या स्वभावाशी शिवसेनेचा स्वभाव जुळला.यातून नीलम गोऱ्हेंचे पक्षातील वर्चस्व वाढत गेले.शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे अनेक प्रश्न मांडले.शिवसेनेतील महिला आघाडी गोऱ्हेंनी मजबूत केली.गोऱ्हेंच्या कामाचा झंझावात पाहून त्यांना विधान परिषदेत पाठवण्यात आले.२००२ साली त्या विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आल्या.२००२ पासून विधान परिषदेच्या आमदार राहिलेल्या नीलम गोऱ्हे यांना २०१९ साली उपसभापती पदाची जबाबदारी मिळाली.२०१९ साली बिनविरोध निवड
महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती पदावर काँग्रेसनेही दावा केला होता.काँग्रेसकडून जोगेंद्र कवाडे यांचे नाव चर्चेत होते. परंतु,या शर्यतीतून त्यांनी माघार घेतली.त्यामुळे, नीलम गोऱ्हे यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली.तेव्हापासून आजतागायत त्या उपसभापती आहे.उपसभापतीचे कर्तव्य बजावताना अत्यंत संवेदनशीलतेने अनेक प्रकरणे हाताळली आहे. त्यामुळे आता त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळाल्याने आगामी काळात त्यांच्यावर आणखी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या येण्याची शक्यता असल्याने पुढील वाटचालीस गडचिरोली संपर्कप्रमुख वर्षा जितेंद्र मोरे (कुंभारे)यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!