Monday, July 13, 2026
Homeगडचिरोलीशिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अर्ज सादर करण्यास मुदतवाढ- २० फेब्रुवारी पर्यंत सादर...

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अर्ज सादर करण्यास मुदतवाढ- २० फेब्रुवारी पर्यंत सादर करण्यात येणार अर्ज

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन २०१९-२०,२०२०-२१, २०२१-२२ चे अर्ज सादर करण्यास २० फेब्रुवारी २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या क्रीडा महर्षीचा गौरव करण्यासाठी राज्य शासनामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार,उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवत्रछपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.संचालनालयाने  १३ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तपत्र टिप्पणीद्वारे पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यास १६ ते ३० जानेवारी २०२३ अशी मुदत केलेली होती. तथापि,या कालावधीत असलेल्या खेलो इंडिया व इतर स्पर्धांच्या अनुषंगाने आयोजित प्रशिक्षणशिबीर व स्पर्धा यासाठी अर्ज करण्यास पुरेसा कालावधी न मिळाल्याने पुरस्कार अर्ज सादर करण्यास २० दिवसांची मुदतवाढ मिळावी;अशी विनंती राज्यातील विविध क्रीडा संघटना व खेळाडूंनी शासनाकडे केली होती.शासनाने वरील विनंतीचा व वस्तुस्थितीचा सर्वकष विचार करुन २० फेब्रुवारी २०२३ रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत पुरस्कार अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्यास मुदतवाढ दिलेली आहे. साहसी क्रीडा पुरस्कारासह सर्व क्रीडा पुरस्कारासाठी कामगिरीचा कालावधी त्या पुरस्कार वर्षातील ३० जून  रोजी संपणाऱ्या वर्षासह विचारात घेण्यात येईल. पुरस्कारासाठी अर्जाचे नमुने शासन निर्णय यासाठी क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.inया संकेतस्थळावरील ताज्या बातम्या मधील लिंकवर पहावे.पुरस्कारासाठी अर्ज सादर करणाऱ्या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक खेळाडू,दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत अर्ज प्रस्ताव अधिक संख्येने सादर करण्याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली प्रशांत दोंदल यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!