Tuesday, October 27, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशिक्षक पात्रता परीक्षेतील गैर प्रकार टाळण्यासाठी प्रथमच 'एआय' तंत्रज्ञानाचा वापर.. - येत्या...

शिक्षक पात्रता परीक्षेतील गैर प्रकार टाळण्यासाठी प्रथमच ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर.. – येत्या रविवारी शिक्षक पात्रता परीक्षा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-यंदाच्या शिक्षक पात्रता परीक्षेत शासनाने मोठा बदल करत एक फोटो दोन नावे तसेच डमी विद्यार्थ्यांवर आळा घालण्यासाठी व २०२० ते २०२२ मध्ये झालेल्या टीईटीतील गैरप्रकाराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रथमच ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.राज्यभरात येत्या,रविवार २३ नोव्हेंबर रोजी दोन सत्रात ही परीक्षा होणार आहे. पहिले सत्र सकाळी १०.३० ते १ वाजे पर्यंत तर दुसरे सत्र दुपारी २.३० ते ५ वाजे पर्यंत असणार आहे.तत्पूर्वी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर दीड तास आधी रिपोर्टिंग आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.अश्यातच बोगस उमेदवारांना ओळखण्यासाठी “कनेक्ट व्ह्यू’, “फोटो व्ह्यू’ आणि “हॉटलाइन’ प्रणालीचा वापर केला जाणार आहे.यंदा नव्याने शिक्षक भरतीसाठी असणाऱ्या उमेदवारांसह शिक्षक म्हणून कार्यरत उमेदवारही शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी)देणार आहेत.त्यामुळे उमेदवारांच्या संख्येत वाढ झाली आहे.वाढलेल्या उमेदवारांमुळे केंद्रांची संख्या देखील वाढवली आहे.परीक्षेत फक्त सेवानिवृत्तीला आलेल्या दोन ते तीनवर्षे बाकी असणाऱ्या शिक्षकांना सूट देण्यात आली आहे.शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय शिक्षकांना पदोन्नतीदेखील मिळणार नसल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे.त्यामुळे यंदा दुप्पट संख्येने शिक्षक पात्रतेसाठी उमेदवार परीक्षेला बसले आहेत.या परीक्षेसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे सांगितले जात आहे.फोटो व्ह्यू मध्ये उमेदवाराची ओळख तंतोतंत जुळवण्यासाठी चेहऱ्यांची तुलना करणारी एआय प्रणाली आहे.कनेक्ट व्ह्यू मध्ये सर्व परीक्षा केंद्रे एका कंट्रोल रूमशी जोडून लाइव्ह मॉनिटरिंग केले जातात. कोणतीही संशयास्पद हालचाल त्वरित निदर्शनास येते.यासाठी ती वापरली जाईल. हॉटलाइन फोनप्रणालीची सुविधा-सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देखील पत्र देण्यात आले आहे.सर्व परीक्षा केंद्रांवर सुरक्षित वातावरणात परीक्षा घेण्यासाठी त्वरित संपर्क करता यावा याकरिता हॉटलाइन फोन सर्व केंद्रांवर असतील.डमी उमेदवारांना शोधण्यासाठी फोटो व्ह्यू आणि कनेक्ट व्ह्यूसाठी एआयचा वापर केला जाईल.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चित्तथरारक घटना..! दोन वाघांची दुचाकीवर झडप; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यातून एक चित्तथरारक घटना समोर आली आहे.रात्रीच्या अंधारात जंगलमार्गे दुचाकीने गावाकडे परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीवर दोन वाघांनी झडप घालून तरुणाला ठार केल्याची घटना...

उद्याला गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटाची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने  उद्या,बुधवार २८ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.तर चंद्रपूर, गोंदिया,नागपूर,वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये...

२७ वर्षीय तरुणाने गळफास घेत संपवली जीवनयात्रा; आज सकाळची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या नगर परिषद हद्दीत येणाऱ्या नैनपूर येथील एका २७ वर्षीय तरुणाने घरी कुणीही नसतांना स्वतःच्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना...

नागपूर पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी? राजकीय वर्तुळात उत्सुकता..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज,मंगळवार २७ ऑक्टोंबरला जाहीर होणार असून अभिजीत वंजारी वर्सेस सुधाकर कोहळे यांच्यापैकी कोण बाजी मारणार,याबाबत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!