Wednesday, October 14, 2026
Homeगडचिरोलीशासकीय काम; भरपूर मिळतो दाम....!- सर्वांचे खिसे गरम होण्यास थोडे दिवस थांब...शासकीय...

शासकीय काम; भरपूर मिळतो दाम….!- सर्वांचे खिसे गरम होण्यास थोडे दिवस थांब…शासकीय यंत्रणेतील प्रकार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- आपण नेहमीच म्हणतो व ऎकत असतो की,दोन नंबरचे काम दारू विक्री,सट्टा पट्टी,कोंबडे बाजार,तंबाखू विक्री व इतर विविध प्रकाचे अवैध धंदेच आहेत.मात्र या सर्वांच्याही वरचढ असलेले दोन नंबरचे काम ते म्हणजे शासकीय यंत्रणेतील काम आहे.अशातच ‘शासकीय काम; दोन नंबरचे भरपूर मिळतो दाम’ असे सर्वच शासकीय यंत्रणेतील प्रकार सर्वत्र दिसून येत आहे.सध्या स्थितीत साहित्य खरेदी एकीकडून केली जाते तर  बिले दुसरीकडून जोडली जात असून सर्वांचे खिसे गरम होण्यास थोडे दिवस थांब होत असल्यानेच शासकीय यंत्रणा चुप्पी साधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

शासकीय यंत्रणेतील कामांमध्ये एक लाख रुपये कामाचे अंदाज पत्रक,तीन लाख रुपयाचे तयार केले जात असल्याने याचे नवल वाटते आहे.कमी लोहा वापरणे,कमी सिमेंट वापरणे,कमी गिट्टी वापरणे,कमी रेती वापरणे व पाच मजूर कामांवर असतांना दहा मजूर कामावर दाखवून अवाढव्य रक्कम उचल करणे,अशी अवस्था सर्वत्र दिसून येत आहे.यामध्ये सर्वांची टक्केवारी नियोजित ठरलेली असते.एका कामावर लाखो रुपये छापण्याचे काम सुरू आहे.

यामुळेच काम ‘झकास न होता भकास’ होतांना दिसून येते.कामावर न जाणाऱ्यांना मिस्त्री व मजूर म्हणून दाखविल्या जाते व उघडकीस येणारे प्रकरण जिल्हा परिषदे पासून तर पंचायत विभागपर्यंत दडपण आणून दाबल्या जाते; ही शोकांतिका आहे.एखादा ‘माजी बनतो व भाजी खातो’ तसाच प्रकार घडत असून ज्याला बांधकामविषयी कुठल्याही प्रकारचा अनुभव नसतांना एखादा तर सोडा तीन-तीन काम देत असतील तर यामध्ये काहीतरी झानगडगुत्ताच दिसून येतो आहे.

सर्वजण सर्वसामान्य जनतेला भुरळ घालत असून शासकीय बांधकाम करणारे किती जण परवाना धारक आहेत? शासकीय यंत्रणेत विना बांधकाम परवान्यांचे काम करतांना हल्ली दिसून येत आहेत.यांच्यावर निर्बंध कोण घालणार?फक्त टक्केवारी मिळाली व खिसे गरम झाले की ‘अपणा काम बनता; कही भी जाये जनता’ असे होत आहे.सर्वजण गाढ झोपेत गेले की काय?असे काम करणाऱ्यांविरोधात जोपर्यंत ठोस पावले उचलली जाणार नाही.तोपर्यंत असेच चित्र सर्वत्र दिसून येणार असल्याने अशांवर आळा घालणे गरजेचे आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर सिंदेवाहीच्या राज्य महामार्गावर गतीरोधक बसविण्यास सुरुवात.. -अपघातांचा संभाव्य धोका कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत सिंदेवाही शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक-९ वरील रस्ता सुरक्षेचा मुद्दा...

संभाव्य पाणीटंचाईसाठी गावनिहाय नियोजन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना.. -पाच तालुक्यांमधील ३६ संवेदनशील गावांमध्ये भूजल पातळी घसरली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन,पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे संरक्षण आणि टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना गती द्यावी.भूजल पातळी घसरलेल्या संवेदनशील...

दुष्काळग्रस्त तालुक्यांत मोफत धान्य वितरणासाठी विशेष नियोजन.. -स्थलांतरितांना इतर ठिकाणच्या रास्तभाव दुकानातून धान्य घेण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुष्काळग्रस्त गडचिरोली व चामोर्शी तालुक्यांतील पात्र कुटुंबांना नियमित मोफत अन्नधान्याचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.शेतीवर अवलंबून असणारे...

‘यूपिआय’ वापरकर्त्यांसाठी दिलासा; शुल्क आकारणी पुढे ढकलली..

उद्रेक न्युज वृत्त :-येत्या,गुरुवार १५ ऑक्टोंबर २०२६ पासून दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पात्र 'पर्सन टू मर्चंट' व्यवहारांवर ०.४ टक्के एमडीआर म्हणजेच 'मर्चेंट डिस्काउंट...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!