उद्रेक न्युज वृत्त
काही दिवसातच तरुणांचा प्रेमाच्या आणा-भाका टाकण्याचा दिन म्हणजे व्हॅलेंटाईन डे १४ फेब्रुवारीला जगभरात साजरा करण्यात येतो.अशातच भारत सरकारने १४ फेब्रुवारी हा दिवस काऊ हग डे म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय,पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने हे निर्देश काढले आहेत.ज्यामध्ये गाईचे महत्त्व लक्षात घेऊन सर्व गोप्रेमींनी १४ फेब्रुवारी हा दिवस ‘काऊ हग डे’ म्हणून साजरा करून आपले जीवन आनंदी आणि सकारात्मक उर्जेने परिपूर्ण बनवा असे आवाहन करण्यात आले आहे.आपल्या सर्वांना माहित आहे की गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि आपले जीवन आणि पशुधन टिकवून ठेवते; असे सांगत १४ फेब्रूवारी हा दिवस ‘गो माता आलिंगन दिन’ म्हणून साजरा करण्याची सुचना केली आहे.