Friday, October 23, 2026
Homeगडचिरोलीवीज कोसळून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू; तर एकजण जखमी..

वीज कोसळून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू; तर एकजण जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज,शनिवार २५ ऑक्टोंबर रोजी विदर्भातील विविध जिल्ह्यात पावसाने दुपारनंतर जोरदार हजेरी लावली.अश्याच प्रकारे आज गडचिरोली शहरासह देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा व कोरची तालुक्यात पावसाने हजेरी लावून वातावरणात गारवा निर्माण केला. अश्यातच कोरची तालुक्यात दुपारच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली.शेतात कामे करीत असतांनाच अचानकपणे विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने पावसाच्या बचावापासून झाडाच्या आडोशाला उभे राहण्यासाठी गेलेल्या झाडावरच वीज कोसळल्याने दोन पैकी एका १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला,तर एकजण विजेच्या धक्क्याने जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सरगम सोमनाथ कोरचा वय १७ वर्षे,रा.केसालडाबरी, ता.कोरची,जि.गडचिरोली असे मृतक मुलाचे नाव असून तो कोरची तालुक्यातील मसेली येथील छत्रपती विद्यालयात इयत्ता दहाव्या वर्गात शिक्षण घेत होता.तर योगेश घावळे वय १७ वर्षे, रा.गुजूरबडगा,ता.देवरी, जि.गोंदिया असे जखमी मुलाचे नाव असून तो सरगमचा नातेवाईक होता.
आज शनिवारी दुपारच्या सुमारास सरगमचे वडील सोमनाथ कोरचा यांच्या शेतात धान कापणीसह धानाची गंजी तयार करणे सुरू होते.दुपारच्या सुमारास अचानकपणे पावसाने हजेरी लावली.सरगम आणि योगेश दोघेही शेतावरच असल्याने पावसामुळे शेतातील मोहाच्या झाडाच्या आडोशाला गेले.तर सरगमचे वडील काही अंतरावर उभे होते.तितक्याच अचानकपणे मोहाच्या झाडावर वीज कोसळली.यात सरगम व योगेश दोघेही जमिनीवर कोसळले.लागलीच सरगमच्या वडिलांनी ग्रामस्थांना माहिती देत दोघांनाही कोरचीच्या ग्रामीण रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी सरगमला मृत घोषित केले.तर योगेश घावळे जखमी झाल्याने तिथे प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारार्थ चिचगडच्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिध्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ योजना सुरु केली आहे.या योजनेतंर्गत १ एप्रिल...

जलस्रोतांमधून पाणी उपसा करणारे मोटार पंप अथवा इंजिन काढून घेण्याबाबत कोणतेही आदेश नाहीत.. -अप्रमाणित संदेशांवर शेतकरी व नागरिकांनी विश्वास ठेवू नये; जिल्हा परिषदेच्या संबंधित...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जलस्रोतांमधून पाणी उपसा करणारे मोटार पंप अथवा इंजिन काढून घेण्याबाबत तसेच ते जप्त करण्याबाबत कोणतेही आदेश जारी केलेले नाहीत, असा खुलासा...

अखेर शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली; पीएम किसान योजनेचे दोन हजार येणार बँक खात्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या देशातील कोट्यवधी शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी असून प्रतीक्षा संपली आहे.येत्या,शुक्रवार...

कुरुड रेती घाटाचे टीप्पर कोंढाळ्याच्या रस्त्यांवरून.. -वाहनात क्षमतेपेक्षा अधिकची रेती; संबंधित विभागाचे दुर्लक्ष..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-काही महिन्यांपासून देसाईगंज तालुक्यात बंद असलेला रेतीचा खेळ आणखी पुन्हा सुरू झाल्याने "दाल में कूछ काला है भाया"अशी म्हणण्याची वेळ आली आहे.पैश्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!