Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीविधानसभा निवडणुक : सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना १० हजार रुपये तर अनुसूचित जाती...

विधानसभा निवडणुक : सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना १० हजार रुपये तर अनुसूचित जाती व जमातीच्या उमेदवारांसाठी ५ हजार रुपये..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-विधानसभा निवडणुकीसाठी आज,   मंगळवार २२ ऑक्टोंबर पासून नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना १० हजार रुपये तर अनुसूचित जाती व जमातीच्या उमेदवारांसाठी ५ हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे.प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रावर एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व तीन विधानसभा मतदारसंघांतील इच्छुक उमेदवारांना त्या-त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ वाजता यावेळेत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहेत.
निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. सर्व तीन विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले असून कार्यालयांमध्ये आजपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन,व्हीव्हीपॅट मशीनही सज्ज करून ठेवण्यात आल्या आहेत.तसेच मतदार याद्याही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
 
निवडणूक कार्यक्रम👇
 
१) मंगळवार दिनांक- २२ ऑक्टोंबर नामनिर्देशन सादर करण्यास सुरुवात
२) मंगळवार दिनांक- २९ ऑक्टोंबर नामनिर्देशन सादर करण्याचा अंतिम दिनांक
३) बुधवार दिनांक-३० ऑक्टोंबर नामनिर्देशपत्र छाननी
४) सोमवार दिनांक-४ नोव्हेंबर नामनिर्देशनपत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत
५) बुधवार दिनांक- २० नोव्हेंबर मतदान
६) शनिवार दिनांक-२३ नोव्हेंबर मतमोजणी
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!