Saturday, September 12, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तविद्युत वितरण कंपनीचा ग्राहकांना जोरदार झटका..! दोन महिने बिल न भरल्यास सुरक्षा...

विद्युत वितरण कंपनीचा ग्राहकांना जोरदार झटका..! दोन महिने बिल न भरल्यास सुरक्षा ठेवीतून रक्कम करणार कपात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-पूर्वी दोन महिने वा त्याहून अधिक महिने लाईट बिल भरले नाही तरीही चालत होते आणि काही दिवसांसाठी वीज पुरवठा खंडित करून संपूर्ण बिल भरल्यास वीज पुरवठा सुरळीत केला जात होता.मात्र,आता जुलै महिन्यापासून पूर्वीची चालत आलेली परंपरा बंद करून विद्युत वितरण कंपनीने थकीत बिल वसूल करण्याच्या नावाखाली नवा फंडा आणला आहे.विद्युत वितरण कंपनीच्या नव्या फंड्यानुसार आता ज्या वीजग्राहकांनी दोन महिन्यांचे विद्युत बिल भरलेले नाहीत,अश्यांच्या सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या ठेवीतून थकबाकीची रक्कम कपात केली जाईल,असा निर्णय विद्युत वितरण कंपनीने घेतलेला आहे.(सुरक्षा ठेव रक्कम ही आपल्याकडे आलेल्या लाईट बिलावर दिलेली असते)याची अंमलबजावणी जुलैपासून सुरू झाली आहे.महावितरण कंपनी आर्थिक अडचणीत सापडत असल्याचे कारण देत सदरचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे आता सलग दोन महिन्यांचे वीज बिल थकल्यास तिसऱ्या महिन्यात ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीतून थकबाकीची रक्कम कपात केली जाणार आहे.सदरची रक्कम एकदा कपात झाली की,नंतर ग्राहकाला प्रथम सुरक्षा ठेवीची रक्कम व त्यानंतर बिलातील इतर शिल्लक रक्कम भरणे बंधनकारक असेल.रक्कम न भरल्यास ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला जाईल.त्यानंतर ग्राहकाला पुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी सुरक्षा ठेव, बिलाची थकबाकी भरावी लागेल.शुल्क भरूनच वीज जोडणी पूर्ववत करता येणार आहे.सदरच्या निर्णयामुळे विद्युत ग्राहकांना एकप्रकारे जोरदार झटकाच मिळाला म्हणावे लागेल.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!