Saturday, September 12, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तवाढते तापमान बघता जीवाची काळजी घ्या; भर उन्हामध्ये जाण्याचे टाळावे..

वाढते तापमान बघता जीवाची काळजी घ्या; भर उन्हामध्ये जाण्याचे टाळावे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त:-तापमानामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.मात्र,काम करणाऱ्यांना घराबाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही.वाढते तापमान बघता आरोग्य विभागाने आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.यात शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हामध्ये जाण्याचे टाळावे आणि भरपूर पाणी प्यावे,असे आवाहन करण्यात आले आहे. तापमानामध्ये बरीच वाढ झालेली असून,उष्ण लाटेमुळे कामगार, शेतकरी,भिकारीवर्ग,रस्त्यावरील विक्रेते,वयोवृद्ध, बालके,स्त्रिया आदी संवेदनशील गटांवर प्रतिकूल परिणाम होऊन त्याचा आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गटातील व्यक्तींनी विशेषतः बांधकामांचे कार्य करणाऱ्या कामगारांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.दुपारच्या वेळी शक्यतो बाहेर पडणे टाळावे व जास्तीत जास्त प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे.
शक्यतो १२ ते ४ दुपारच्या वेळेत काम बंद ठेवून बाहेर उन्हामध्ये जाण्याचे टाळावे.कामाच्या वेळा सकाळी व सायंकाळी ठेवाव्यात.उन्हामध्ये घराबाहेर जात असतांना किंवा काम करत असतांना डोके व कान झाकण्याकरिता पांढऱ्या रंगाचा सुती कपडा किंवा दुपट्ट्याचा वापर करावा.पाणी भरपूर प्यावे,तसेच दुपारच्या वेळेस ओआरएस,ताक,लिंबूपाणी, नारळपाणी,उसाचा रस इत्यादी द्रव्यांचे सेवन करावे.
कामाच्या ठिकाणी संबंधित ठेकेदारांनी,संस्थेने कामगारांकरिता मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी, सावलीकरिता शेड उपलब्ध करून द्यावे व त्यांना दुपारच्या सत्रात विश्रांतीकरिता आवश्यक नियोजन करावे.कार्यालयामध्ये अभ्यागतांसाठी पिण्याचे पाणी व सावलीकरिता शेडची व्यवस्था करावी.प्रवास करतांना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.पातळ,सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावेत.थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असतांना छत्री,टोपी, टॉवेल आणि इतर पारंपरिक साधनांचा वापर करावा.
उन्हात बाहेर जातांना शूज किवा चप्पल घालावी.सर्वांनी जीवाची काळजी घ्यावी; विशेष म्हणजे लहान मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!