Sunday, August 30, 2026
Homeगडचिरोलीवाघ अन् बिबट्याचा थरार; जखमी बिबट्याचा नागरिकांवर हल्ला.. - तिघे गंभीर जखमी,तर...

वाघ अन् बिबट्याचा थरार; जखमी बिबट्याचा नागरिकांवर हल्ला.. – तिघे गंभीर जखमी,तर एकजण किरकोळ जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-वाघ आणि बिबट्याच्या झुंजीत निपचित पडलेल्या बिबट्याचा मृत्यू झाला असावा,अशी मनधारणा झालेल्या नागरिकांनी बिबट्याजवळ जाऊन पाहताच धाडकन उठून उभा झालेल्या बिबट्याने चार नागरिकांवर हल्ला चढवून तिघांना गंभीर केले.तर एकास किरकोळ दुखापत झाल्याची घटना आज,बुधवार २५ मार्च रोजी सकाळच्या सुमारास पोर्ला वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चांभार्डा-मरेगाव मार्गावर घडली.विलास दादाजी ठाकरे वय ४८ वर्षे,रेखा विठ्ठल मडावी वय ४५ वर्षे,दोघेही रा. चांभार्डा,ता.जि.गडचिरोली व लुमाजी मुनघाटे वय ४० वर्षे,रा.टेंबा,ता.जि.गडचिरोली हे गंभीर जखमी झाले असून स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारार्थ गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.तर चांभार्डा येथील ३७ वर्षीय लीलाधर मुनघाटे हे किरकोळ जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
आज बुधवारच्या सकाळी आठ वाजेच्या सुमारास चांभार्डा-मरेगाव पांदण रस्त्यालगत हरिदास मुनघाटे यांच्या शेताजवळ एक बिबट जखमी अवस्थेत निपचित पडलेला दिसून आल्याने मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी त्याच्या जवळ जाऊन पाहिले.मात्र,बिबट्याने त्यांच्यावरच हल्ला केला.यामुळे तिघेही गंभीर जखमी झाले.तर एकजण किरकोळ जखमी झाला.माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आर.डी.पाचभाई आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर,पशुवैद्यकीय विभागाच्या चमूला पाचारण करण्यात आले.हल्ला चढवल्यानंतर कुठलीही हालचाल करत नसल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.प्रसंगी बिबट्याच्या शरीर आणि मानेवर दुसऱ्या प्राण्याचे दात व नखे रुतल्याच्या खोल जखमा दिसून आल्या.प्राथमिक अंदाजानुसार,बिबट्याची दुसऱ्या एखाद्या वाघासोबत झुंज झाली असावी आणि त्यात लागलेल्या गंभीर जखमांमुळेच त्याचा मृत्यू झाला असावा,असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी सहायक उपवनसंरक्षक आर.एस.सुर्यवंशी, पोर्लाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर.डी.पाचभाई,आरमोरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार कैलास व्ही.गवते,पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.मृणाल टोंगे व शीघ्र कृती दलाचे कर्मचारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!