Friday, October 16, 2026
Homeगोंदियावाघाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी..

वाघाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जंगल परिसरात तेंदूपाने संकलन करीत असतांनाच दबा धरून बसलेल्या वाघाने एका महिलेवर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना काल शनिवारी गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरणाच्या लगत असलेल्या गंधारी-जांभळी जंगल परिसरात घडली.सुनीता चंद्रकुमार हटवार वय ४७ वर्षे,रा.बोंडगाव सुरबन,ता.अर्जुनी-मोरगाव,जि.गोंदिया असे वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
सध्या विदर्भातील गडचिरोली,चंद्रपूर,नागपूर,गोंदिया, भंडारा व इतर तालुक्यात तेंदूपत्ता तोडण्याचा हंगाम सुरू आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंब तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात जातात.विशेष म्हणजे,ग्रामीण भागातील ग्रामस्थांना तब्बल दीड महिने रोजगार मिळतो. अश्याच प्रकारे गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बोंडगाव सुरबन येथील महिला सुनिता हटवार या काल शनिवारी सकाळच्या सुमारास इटियाडोह धरणाच्या लगत असलेल्या गंधारी-जांभळी जंगल परिसरात तेंदूपाने संकलनासाठी गावातील इतर महिला तथा आपल्या पतीसोबत गेल्या होत्या.दरम्यान, तेंदूपाने संकलन करीत असतांनाच दबा धरून बसलेल्या वाघाने सुनीतावर पाठीमागून हल्ला चढवून गंभीर जखमी केले.यामुळे घाबरलेल्या सुनीताने जोर-जोराने ओरडायला सुरुवात केली व वाघाच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न केला.ओरडल्याने वाघाने घटनास्थळावरून पळ काढला.अश्यातच सुनीताचा आवाज ऐकून आजूबाजूला असणारे सर्व तेंदूपाने संकलन करणाऱ्या महिला व मजूर तिच्या दिशेने धावून गेले.यावेळी त्यांना सुनीता जखमी अवस्थेत आढळली. यानंतर लगेच तिला उपचारार्थ गोठणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन प्राथमिक उपचार करण्यात आले.त्यानंतर पुढील उपचारार्थ नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.तिथे सुनीतावर उपचार सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!