Monday, August 17, 2026
Homeनागभिडवाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी; वाघाची पाठीमागून झडप..

वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी; वाघाची पाठीमागून झडप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागभीड(चंद्रपूर):-गावाजवळच्या परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने प्राणघातक हल्ला चढवून गुराख्यास गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना आज,रविवार १२ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास नागभीड तालुक्याच्या पळसगाव गावाजवळ असलेल्या सावंगी बडगे परिसरात घडली.कांचन प्रकाश खोब्रागडे वय ३० वर्षे,रा.सावंगी बडगे,ता.नागभीड,जि.चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गुराख्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,कांचन खोब्रागडे हे आज  नेहमीप्रमाणे आपल्या घरच्या गायी,म्हशी व शेळ्या चारण्यासाठी सावंगी बडगे गावाजवळील गोसेखुर्द कालव्याच्या जंगल शिवारात गेले होते.गुरे चराई करीत असतांना ते बाजूलाच मोकळ्या जागेत बसून होते. दरम्यान,झुडपात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक त्यांच्या दिशेने पाठीमागून हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कांचन खोब्रागडे यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली.त्याचवेळेस काही अंतरावर असलेले गुराखी रवी वाटगुरे यांनीही जोरजोराने ओरड केली असता वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.मात्र,वाघाच्या हल्ल्यात कांचन खोब्रागडे यांना गंभीर दुखापत झाली.त्यांच्या खांद्यावर वाघाच्या पंज्याचा मोठा खड्डा पडला असून हात आणि कंबरेला मोठा मार लागला आहे.घटनेची माहिती गावात होताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेत खोब्रागडे यांना दुचाकीवरून तळोधी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.त्यानंतर,वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात भेट दिली.प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ चंद्रपूर शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

सावधान..! ऑनलाईन गेमिंगचा नाद ठरू शकतो जीवघेणा.. – गेमिंगमध्ये पैसे गमावल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुणाने घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-आजच्या घडीला जवळपास ९९ टक्के लोकांकडे स्मार्टफोन असल्याने यातील अनेकजण चालता-बोलता कनेक्ट होण्यासह पैसे कमावण्याचे मार्ग शोधतांना दिसून येतात.त्यातच,काहीजण पैसे कमाविण्याचा सोपा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!