Saturday, May 2, 2026
Homeपालघरवनक्षेत्रपालाने चक्क २० लाखाची लाच मागितल्या प्रकरणी अनेकांच्या उंचावल्या भुवया..! -...

वनक्षेत्रपालाने चक्क २० लाखाची लाच मागितल्या प्रकरणी अनेकांच्या उंचावल्या भुवया..! – लाच प्रकरणी वनक्षेत्रपालास अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
पालघर :-पालघर जिल्ह्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २० लाख रुपयांची लाच मागणाऱ्या मांडवी वन परीक्षेत्रातील वनक्षेत्रपाल संदीप चौरे याला अटक केली आहे.वनक्षेत्रपाल कर्मचाऱ्याने चक्क २० लाख रुपयांची लाच मागितल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
वसई तालुक्यातील ससुनवघर येथील मालमत्तेवर
ताबा मिळवून देण्यासाठी वनक्षेत्रपाल संदीप चौरे
आणि खासगी इसम चंद्रकांत पाटील यांनी
तक्रारदाराकडे लाच मागितला होती.त्यानुसार
तक्रारदाराने पालघरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.तक्रार दाखल केल्यानंतर १९ नोव्हेंबर आणि १३ डिसेंबर रोजी
त्याची पडताळणी करण्यात आली.आरोपींनी
ठरलेल्या २० लाखांपैकी १० लाखांची रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविली होती.त्यानंतर,
फिर्यादीच्या तक्रारीनुसार सापळा रचत एसीबीच्या पथकाने खासगी इसम चंद्रकांत पाटील याला १० लाख रुपयांची रोकड घेताना रंगेहात अटक केली.त्यानंतर, वनक्षेत्रपाल संदीप चौरे याचाही यात समावेश असल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संदीप चौरे यालाही अटक केली आहे.दरम्यान,तक्रारीनुसार आरोपींविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!