Monday, August 17, 2026
Homeनागपूरवडिलांची नाही तर आईची कागदपत्रे विचारात घेऊन जात वैधता प्रमाणपत्र जारी करण्याचे...

वडिलांची नाही तर आईची कागदपत्रे विचारात घेऊन जात वैधता प्रमाणपत्र जारी करण्याचे निर्देश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-कित्तेक प्रकरणांमध्ये केवळ वडिलांच्या नावांची कागदपत्रे विचारात घेऊन जात प्रमाणपत्र,जात वैधता प्रमाणपत्र,उत्पन्नाचा दाखला व इतर महत्वाची दस्तऐवजे वेगवेगळ्या ठिकाणी द्यावी लागत असतात. मात्र,वेगळे राहत असलेल्या वडिलांनी जर कां कागदपत्रे देण्यास नकार दिल्यास मुलांचे भवितव्य अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही.असाच प्रकार एका मुलाच्या बाबतीत घडल्याने त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली.प्रकरणी न्यायलयाने दिलेल्या निर्णयाने अनेक मुलांचे भवितव्य अंधारातून उजेडात आले आहे.न्यायलयाने जन्म झाल्यापासूनच वडिलांसोबत राहत नसलेल्या मुलाला आईची कागदपत्रे विचारात घेऊन जात वैधता प्रमाणपत्र(कास्ट व्हॅलिडीटी) जारी करण्यावर निर्णय घ्या,असा आदेश भंडारा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला दिला असून याकरिता समितीला २० फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे.
प्रकरणामध्ये मुलाचे आई-वडील त्याच्या जन्मापूर्वीच वेगळे झाले.त्यामुळे तो जन्मापासून आईसोबत राहत आहे.वडिलांचा त्याच्या पालनपोषणाला काहीच हातभार लागला नाही.आईनेच कष्ट करून त्याला लहानाचे मोठे केले आणि उच्चशिक्षणाकरिता पात्र केले.मुलाचे वडील मध्यप्रदेश तर,आई महाराष्ट्रातील रहिवासी आहे.दोघेही लोहार जातीचे असून ही जात या दोन्ही राज्यांमध्ये भटक्या जमाती प्रवर्गामध्ये मोडते.असे असतांना वडिलांच्या जातीची कागदपत्रे सादर केली नाही,या कारणामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने ९ डिसेंबर २०२१ रोजी मुलाला लोहार-भटक्या जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र नाकारले.परिणामी,मुलाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून या निर्णयाला आव्हान दिले होते.याचिकेवर न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर व नंदेश देशपांडे यांच्यासमक्ष अंतिम सुनावणी झाली.दरम्यान,मुलाचे वकील ॲड.शैलेश नारनवरे यांनी प्रकरणातील तथ्यांकडे लक्ष वेधून जातवैधता प्रमाणपत्रासाठी वडिलांची कागदपत्रे मागणे मुलाकरिता अन्यायकारक आहे,असा दावा केला.तसेच,मुलगा वडिलांची कागदपत्रे देऊ शकत नाही.त्यामुळे त्याला आईचेच कागदपत्रे विचारात घेऊन जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे,अशी मागणी केली. त्यानुसार,मुलाला आईच्या कागदपत्रांवरून जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्णय दिला.यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारचा भीषण अपघात; पोलिस कर्मचारीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी- बोर्डा वळण मार्गावर आज,सोमवार १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका महिला पोलिस कर्मचारीचा...

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!