उद्रेक न्युज वृत्त :-लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी असून मागील जून महिन्याचे दीड हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी यांनी दिली आहे.काल शुक्रवारच्या रात्री महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत सदरची माहिती दिली आहे.मागील जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरु झाली असून या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत.असे त्यांनी म्हटले आहे.त्यानुसार पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात आज,शनिवार ५ जुलै पासून पैसे येण्यास सुरुवात झाली आहे.तर येत्या दोन ते तीन दिवसांत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.आता पर्यंत एकूण ११ हप्ते जमा करण्यात आले असून जून महिन्याचा १२ हप्ता आजपासून जमा होत आहे.
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी..! जून महिन्याचे दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

