- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिन्याकाठी लाभार्थी महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होतात.ज्यावेळी योजना अंमलात आणण्यात आली,त्यावेळेस राज्यातील कोट्यवधी महिलांनी योजनेचे फॉर्म भरून लाभ घेतला.मात्र, अश्याही काही महिला आहेत की,त्यांना सदर योजनेचा लाभ अजूनपावेतो मिळालेला नाही.त्यामुळे अशिक्षित व गरजू महिला आपल्यालाही लाडकी बहिण योजनेचे लाभ मिळावे, यासाठी प्रयत्न करीत असतांनाच महिलांची फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली.याची भनक पोलिसांना लागताच सदरची टोळी पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकली.प्रकरणी टोळीतील तिघांना जुहू पोलिसांनी अटक केली आहे.अविनाश कांबळे,फाल्गुनी जोशी आणि श्रुती राऊत,अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
अविनाश कांबळे,फाल्गुनी जोशी आणि श्रुती राऊत हे तिघेही महिलांना लाडकी बहीण योजनेतून पैसे मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यांचे आधारकार्ड, पासबुक,पॅनकार्डसह सर्व महत्त्वाची कागदपत्रे घेऊन नव्या सीमकार्डच्या आधारे बैंक खाते उघडायचे. त्यानंतर ही बँक खाती फसवणूक आणि मनी लॉड्रिंगसाठी सायबर भामट्यांना विकत होते.सुरत, गुजरातमधून ही टोळी मुंबईतील गरीब महिलांना आपले ‘लक्ष्य’ बनवत होती.विशेष म्हणजे, झोपडपट्टीतील अशिक्षित,गरजू महिलांना जाळ्यात ओढायचे.भामट्यांनी महिलांची फसवणूक करून जवळपास दीडशे बैंक खाती उघडली होती.जुहू पोलिसांनी महिलांची फसवणूक करून उघडलेली दीडशे बैंक खाती शोधून त्यावरील सुमारे २० लाख रुपये गोठवले आहेत.टोळीने नेहरूनगर, डी.एन.नगर आणि धारावीसह अनेक झोपडपट्टयांतील महिलांची फसवणूक केली आहे.त्यामुळे एखादी अनोळखी महिला वा व्यक्ती आपणांस ‘मी लाडकी बहिण योजनेचे काम करून देतो,तुमची कागदपत्रे द्या’,असे म्हणत असेल तर सावधानता बाळगा. कोणत्याही अनोळख्या वा ओळखीच्या व्यक्तीच्या भुलथापांना बळी पडू नका,अन्यथा पुढील नंबर तुमचाही लागू शकतो.
- Advertisement -

