- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत लोकप्रिय योजना ठरली आहे.सध्या स्थितीत या योजने अंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांची चांदीच-चांदी झाली आहे.सुरुवातील ३ हजार रुपये व नंतर दीड हजार रुपये कोट्यवधी महिलांच्या खात्यात थेट जमा करण्यात आले आहेत.अशातच आता आणखी ३ हजार रुपये म्हणजेच एकूण ७ हजार ५०० रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने दिवाळीनिमित्त लाडक्या बहिणींना दुप्पट भेट देण्याची घोषणा केली होती.दिवाळीनंतर साजऱ्या होणाऱ्या भाऊबीज उत्सवानिमित्त आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना रिकाम्या हाताने जाऊ देणार नाही; असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता लवकरच निवडणूक आचारसंहिता लागू होऊ शकते. अशा परिस्थितीत लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोंबर महिन्यातच दिला जाईल,अशी घोषणा अजित पवार यांनी केली होती.त्यानुसार आज,५ ऑक्टोंबरला लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे ३ हजार रुपये जमा झाले आहेत.लाडक्या बहिणींना ३ हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली असून उर्वरित महिलांच्या खात्यातही रक्कम जमा होणार आहे.ज्या महिलांनी अजून पर्यंत ई-केवायसी केली नसेल अशांनी बँकेत जाऊन त्वरित केवायसी करून घ्यावी.
- Advertisement -

