- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-निवडणूक समोर पाहून लाडक्या बहिणींना खटाखट व अग्रीम अनुदान दिले गेले.परंतु विधवा,निराधार,अपंग बहिणी,मातांचे मानधन मागील तीन महिन्यांपासून रखडले असल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.सरकारचे लाडक्या बहिणींवर प्रेम आहे; मात्र अनुदानाची आम्हाला जास्त गरज असतांनाही आमच्याकडे पाठ का? असा प्रश्न या वृध्द बहिणी विचारत आहेत.
अनेक लाभार्थी तर या अनुदानावरच आश्रित आहेत. हे लाभार्थी सातत्याने बँकेत जाऊन अनुदान आले कां? याबद्दल चौकशी करतात व आल्यापावली निराश होऊन परत घरी जातात.या लाभार्थीची दिवाळीसुद्धा अनुदान रखडल्याने अंधारातच गेली.बऱ्याच महिन्यांपासून अनुदान मिळाले नसल्याने आता त्यांच्यावर दुसऱ्यासमोर हात पसरविण्याची वेळ आली आहे.एकीकडे लाडक्या बहिणींना भरभरून दिले जात असतांना आमच्यासाठी सरकारकडे पैसा नाही कां? हा कोणता न्याय आहे; असा सवाल या निराधार बहिणी आणि लाभार्थी करीत आहेत.
संजय गांधी निराधार योजना,इंदिरा गांधी विधवा व अपंग सहाय्य योजनेच्या लाभार्थी महिलांना कितीतरी महिन्यापासून मानधनच देण्यात आलेले नाही.तसेच श्रावणबाळ,वृद्धापकाळ योजनेच्या वृद्धांचेही मानधन रखडले असल्याने आमच्याकडेही लक्ष असू द्या? असे सुर उमटू लागले आहेत.
- Advertisement -