Monday, July 13, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तलाडकी बहीण योजनेतील महिलांची दिवाळी होणार गोड; पण ई-केवायसीचा खोळंबा.. -दिलेल्या साइटवरून...

लाडकी बहीण योजनेतील महिलांची दिवाळी होणार गोड; पण ई-केवायसीचा खोळंबा.. -दिलेल्या साइटवरून करा ई-केवायसी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-दिवाळीचा सण दहा ते बारा दिवसांवर येऊन ठेपला आहे; यासाठी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थींना सप्टेंबरचा हप्ता देण्यासाठी राज्य सरकारने ४१०.३० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.वित्त विभागाने काल बुधवारी या निधीला मंजुरी दिली असून महाराष्ट्र राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने यासंदर्भातील जीआर काढला आहे.त्यानुसार येत्या काही दिवसांत पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये खात्यात जमा करण्यात येणार आहेत. पण,सध्याच्या घडीला लाडकी बहीण योजनेचे लाभ घेणाऱ्या पात्र महिला लाभार्थींना राज्य सरकारने दोन महिन्यात ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे राज्यातील लाभार्थी महिलांची तारांबळ उडून ई-केवायसीचा खोळंबा झाला आहे.साईटमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने अनेकजण ई-केवायसी पासून वंचित राहणार की काय? असे असतांनाच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी तांत्रिक अडचण दूर करण्याचे स्पष्ट केले होते.अश्यातच आता ज्यांना कुणाला ई-केवायसी करायची असेल,अश्यांनी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून ई-केवायसी करावी, असे ‘उद्रेक न्युज’ च्या वतीने कळविण्यात येत आहे.ई-केवायसी करतांना पात्र लाभार्थी महिलांनी स्वतःचा आधार कार्ड आणि आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल,ज्यांचे विवाह झाले असेल,अशांनी पतीचा आधार कार्ड किंवा ज्यांचे विवाह झाले नसेल अशांनी वडिलांचा आधार कार्ड व मोबाईल स्वतः जवळ ठेवावा. लिंक वरती क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा लाभार्थी महिलांनी आधार क्रमांक टाकून आधार क्रमांकानंतर खाली दिलेला कॅप्चा टाकावा,त्यानंतर खालील सूचना वाचून ओके बटनावर क्लिक करावे,त्यानंतर आलेला ६ अंकी कोड(ओटीपी)प्रविष्ट करावा,सदरचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर महिलांना त्यांच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकावा लागेल,आधार क्रमांकानंतर खाली दिलेला कॅप्चा टाकावा,त्यानंतर खालील सूचना वाचून ओकेच्या बटनावर क्लिक करावे.त्यानंतर आलेला ६ अंकी कोड प्रविष्ट करावा,अखेरच्या टप्प्यात कुटुंब प्रमुखाला १)माझ्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीस नाही किंवा निवृत्तीवेतनाचा लाभ घेत नाही,२) माझ्या कुटुंबातील एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे,या प्रश्नांची होय किंवा नाही अशा स्वरुपात उत्तरे द्यावी लागतील.त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करावे,अशा प्रकारे तुमची ई-केवायसी पूर्ण होईल.मात्र,ई-केवायसी करतांना ट्रॉफीक जास्त असल्याची तांत्रिक अडचण काहीकाळ उद्भवत असते.त्यामुळे तीन ते चार वेळा प्रयत्न करीत रहा, त्यानंतर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल,यासाठी कुणालाही एकही पैसे देण्याची गरज नाही.तुम्ही तुमच्या मोबाईल वरूनच ई-केवायसी करू शकता.
  • ई-केवायसी करण्यासाठी लिंक👇
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!