Tuesday, August 25, 2026
Homeगोंदियालाच घेणाऱ्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याला ३ वर्षाचा कारावास - नक्षलग्रस्त प्रोत्साहन भत्याचा लाभ...

लाच घेणाऱ्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याला ३ वर्षाचा कारावास – नक्षलग्रस्त प्रोत्साहन भत्याचा लाभ देण्यासाठी मागितली होती लाच

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :-आरोग्य सेविकेला नक्षलग्रस्त प्रोत्साहन भत्याचा लाभ देण्यासाठी ६ हजारांची लाच घेणाऱ्या देवरीच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याला तदर्थ विशेष सत्र न्यायालयाने ३ वर्षांचा सश्रम कारावास व २५ हजार रूपये दंड ठोठावला.ही सुनावणी ४ मार्च रोजी करण्यात आली.डॉ.श्रीप्रकाश किशोरीलाल नागपुरे वय ६१ वर्षे असे तत्कालीन तालुका वैद्यकीय अधिकारी देवरी रा.गोंदिया असे आरोपीचे नाव आहे.

देवरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र घोनाडी येथील आरोग्य सेविका रेखा अर्जुन गोफने (२५) रा. सिंगणडोह,पो.पालांदुर जमीदारी,ता.देवरी यांना नक्षलग्रस्त भत्यासाठी ७ हजारांची लाच मागितली होती.तडजोड अंती ६ हजारांची लाच घेताना २४ जुलै २०१४ रोजी सापडा रचून त्याला अटक करण्यात आली.या प्रकरणात देवरी पोलिसात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा अंतर्गत येथे गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणावर तदर्थ विशेष सत्र न्यायालयाने ४ मार्च रोजी सुनावणी केली.न्यायाधीश एन.बी.लवटे यांनी ही सुनावणी केली.या सुनावणीत कलम ६० (१) अंतर्गत 3 वर्षाचा सश्रम कारावास,१३ (२) अंतर्गत ३ वर्षाचा सश्रम कारावास व २५ हजार रूपये दंड ठोठावला.या प्रकरणात सरकारी वकील म्हणून ॲड. कैलाश खंडेलवाल यांनी काम पाहिले.न्यायालयात पाच साक्षीदार तपासण्यात आले.न्यायालयाने साक्षीदारांच्या बयानावरून व पुराव्याच्या आधारे सुनावणी केली.

आरोग्य विभागात नक्षल अतिदुर्गम भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त्त प्रोत्साहन भत्ता मासिक ६ हजार रुपये शासनाकडून मिळतो.एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ या कालावधीकरिता भत्त्याचे ६ हजार रूपये मासिक दराने ७२ हजार रुपये मंजूर झाले होते.त्या बिलाचे १० टक्के ७ हजार २०० रुपये द्या; अन्यथा पुढचे बिल मंजूर करणार नाही.असे आरोपीने म्हटल्यामुळे त्यांनी त्याला लाच घेताना रंगेहाथ पकडून दिले होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!