उद्रेक न्युज वृत्त
इंदौर : हल्ली सोशल मीडियाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.लाइक्स,शेअर मिळवण्याच्या नादात कोण,केव्हा काय करेल सांगताच येत नाही.आजची तरुणाई जीव धोक्यात घालून जगावेगळे करू पाहत आहे.अशाच प्रकारे इंदौर मधील दोन तरुणांनी चक्क चालत्या बाईकवरच शेकोटी पेटवत व्हिडिओ बनवला आणि पोस्ट केला.
त्यांच्या व्हिडीओला अपेक्षित लाईक्स मिळाल्या; पण पोलिसांकडून असले प्रकार पुन्हा न करण्याची सक्त ताकीदही मिळाली.दोन तरुण रात्री बाईकवरून जात असताना मागे बसलेला तरुण चालकाच्या पाठीला पाठ लावून बसला.दोन पायांच्या मध्ये पेटलेली शेकोटी ठेवलेली असून तो शेकत होता.बाईकच्या वेगामुळे वारा उलट्या दिशेने वाहत असल्याने तरुणाला शेकोटीच्या ज्वालांचा धोका जाणवत नाही.मात्र इतर वाहन चालकांना शेकोटीचा धोका निर्माण होतो.पोलिसांना सदर प्रकार निदर्शनास आल्यावर त्यांनी असा विचित्र प्रकार का करताय, असे विचारल्यावर सोशल मीडियासाठी व्हिडिओ बनवत असल्याचे तरुणांनी सांगितले.त्यानंतर पोलसांनी सदर तरुणांना ताकीद दिली आहे.