Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीराज्यात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहास प्रारंभ...

राज्यात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहास प्रारंभ…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या येत्या १४ एप्रिल २०२५ रोजी १३४ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून राज्यात सामाजिक समता सप्ताहास प्रारंभ करण्यात आला आहे.सदर सामाजिक समता सप्ताह ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत साजरा करण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे औचित्य साधून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२५ पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या अंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गडचिरोली याच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन पार पडले. यावेळी डॉ.देवसुदन धारगावे उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गडचिरोली यांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या उद्देशिकाच्या  प्रतींचे अनावरण करण्यात आले.त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करुन जनजागृती करण्यात आली.कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गडचिरोली कार्यालयातील बहुसंख्य अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!