Wednesday, September 16, 2026
Homeगडचिरोलीराज्याच्या मुख्य सचिवांकडून डिजिटल आउटडोर स्क्रीनची पाहणी करून अभिनव उपक्रमाचे कौतुक..

राज्याच्या मुख्य सचिवांकडून डिजिटल आउटडोर स्क्रीनची पाहणी करून अभिनव उपक्रमाचे कौतुक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्याचे मुख्य सचिव तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालक सचिव राजेश अग्रवाल यांनी आज, रविवार ७ जून रोजी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने उभारण्यात आलेल्या डिजिटल आउटडोर स्क्रीनची पाहणी करून या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे आणि कमी खर्चात पोहोचविण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. याप्रसंगी विभागीय अप्पर आयुक्त माधवी खोडे व गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा उपस्थित होते.
सामाजिक न्याय विभागाच्या प्रवेशद्वाराजवळ जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रसारित करण्यासाठी अत्याधुनिक डिजिटल स्क्रीन उभारण्यात आली आहे.या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती सातत्याने आणि आकर्षक पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचविणे शक्य झाले आहे.
डिजिटल स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात येणाऱ्या माहितीची पाहणी करतांना मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी पारंपरिक प्रसिद्धी माध्यमांसोबतच डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर केल्यास शासनाच्या योजना अधिक व्यापक स्तरावर आणि जलद गतीने नागरिकांपर्यंत पोहोचू शकतात,असे त्यांनी नमूद केले.जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी डिजिटल स्क्रीनची संकल्पना,कार्यपद्धती,माहिती प्रसारणाची प्रक्रिया तसेच या माध्यमातून होणारे फायदे याबाबत मुख्य सचिवांना सविस्तर माहिती दिली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सात गावांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी नियमित बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्यातील  आंधळी,नवरगाव,वाघेडा,बेलगाव,खैरी,मालदुगी आणि घाटी या सात गावांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी सकाळी व सायंकाळी नियमित बससेवा उपलब्ध करून द्यावी,अशी ठाम मागणी ग्राम...

प्रत्येक दुर्दैवी मृत्यूनंतर थेट डॉक्टरांना दोषी ठरवण्याऐवजी आजाराचे गांभीर्य समजून घेणे अत्यंत आवश्यक- जिल्हा शल्य चिकित्सक -डॉक्टरांकडून नवजात बालकाचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे वैद्यकीय प्रयत्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे दाखल झालेल्या एका क्षयरोगग्रस्त जोखमीच्या गरोदर मातेची तातडीने यशस्वी शस्त्रक्रिया करून मातेचा जीव वाचवण्यात...

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘गोंडवानाचा महायोध्दा: क्रांतिवीर बाबूराव शेडमाके’ नाटकातील नाट्यांश विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातील प्रसिध्द नाटककार तथा महाराष्ट्र शासन पुरस्कृत साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांच्या मधुश्री प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या व संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या...

सिंदेवाहीत अभियंता दिन उत्साहात साजरा.. – गडबोरीच्या विद्यार्थ्यांना नवोदय मार्गदर्शिका व शैक्षणिक साहित्याचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्त गडबोरी येथील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!