Thursday, September 10, 2026
Homeगडचिरोलीराज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री उद्याला गडचिरोलीत..

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री उद्याला गडचिरोलीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर हे उद्या,शुक्रवार १३ फेब्रुवारी आणि १४ फेब्रुवारी २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
उद्या,शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता भामरागड तालुक्यातील लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे आगमन व पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांचे समवेत सदिच्छा भेट.दुपारी २ ते ४.१५ वाजता भामरागड ग्रामीण रूग्णालय,उपजिल्हा रुग्णालय अहेरी,प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथे भेट व पाहणी करतील. सायंकाळी ७.३० वाजता शासकीय आश्रमशाळा गडचिरोली येथे आगमन व राखीव.
शनिवार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता जिल्हा रुग्णालय आणि महिला व बाल रुग्णालय येथे भेट व पाहणी.सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषदेच्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांसोबत चर्चा.सकाळी ११.३० वाजता राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह जिल्ह्यातील सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी, खासदार,आमदार आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी यांची बैठक.दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.दुपारी २.३० वाजता शोधग्राम (चातगाव)कडे प्रयाण.दुपारी ३.०० वाजता शोधग्राम (चातगाव)येथे पद्मश्री डॉ. अभय बंग यांचे समवेत सदिच्छा भेट.सायंकाळी ४.३० ते ५.१५ प्राथमिक आरोग्य केंद्र पोर्ला व उपजिल्हा रूग्णालय आरमोरी येथे भेट व पाहणी.सायंकाळी ५.३० वाजता नागभिड मार्गे नागपूरकडे प्रयाण.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने उद्या,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली...

राज्यस्तरीय ज्युनियर ‘कुंग फू’ स्पर्धेत वांगेपल्ली शाळेच्या मोहनला कांस्यपदक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पुणे येथे पार पडलेल्या २४ व्या राज्यस्तरीय 'ज्युनियर वुशू स्पर्धा-२०२६' मध्ये अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शासकीय निवासी शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी...

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!