- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवून आणून पूल उडवून देण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न गडचिरोली पोलिसांनी हाणून पाडला आहे. नक्षलवाद्यांनी भामरागड आणि ताडगावला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलावर काही स्फोटके पेरून ठेवल्याची विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यावरून स्फोटकांचा शोध घेऊन ते निकामी करण्यासाठी गडचिरोलीहून एक बॉम्ब शोध व नाशक पथक हेलिकॉप्टरने घटनास्थळी पाठविण्यात आले.
छत्तीसगड सीमेवरील नक्षलप्रभावित भामरागड येथे पर्लकोटा नदीजवळ नव्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अवघे चार दिवस शिल्लक असताना ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे उद्या गृहमंत्री अमित शहा प्रचारसभेसाठी गडचिरोली येत आहेत.नक्षल्यांनी घातपाताच्या दृष्टीने हा स्फोट घडवून आणायचा होता असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
- Advertisement -