उद्रेक न्युज वृत्त
सत्यवान रामटेके
गडचिरोली :- महाराष्ट्र राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सार्वजनिक कामे मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सर्व सार्वजनिक कामावरील मजूरांची हजेरी NMMS वरच नोंदवायची आहे.महाराष्ट्र राज्यात मजूर मित्र (मेट) व्दारे NMMS ॲपचा वापर करुन हजेरी नोंदविण्याचा प्रथम प्रयोग आहे. सुरुवातीला ‘मजूर मित्र’ यांना सध्या अकुशल मजुरीच्या दराप्रमाणे मजुरी अदा करुन NMMS ची १००% अमंलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानुसार कामाच्या ठिकाणी २० ते ४० मजूर उपस्थिती असल्यास देखरेख करण्यासाठी प्रत्येक २० मजूरांच्या मागे एक व ४१ ते ८० पर्यंत उपस्थिती असल्यास त्यापुढील प्रत्येक १० मजूरामागे एक या पटीने अतिरिक्त ‘मजूरमित्र’ यांची निवड करण्यात येणार आहे.
१ जानेवारी २०२३ पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेशी संबधीत सर्व यंत्रणांना यापुढे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजूर उपस्थिती (वैयक्तिक कामे वगळून) NMMS वरच नोंदविण्यात याव्यात अशा स्पष्ट सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.
मजूर मित्र (मेट) निवडीसाठीची पात्रता :-
‘मजूर मित्र’ हा सक्रिय मजूर असावा.मजूर मित्र यांच्या निवड प्रक्रियेमध्ये स्वयंसहायता बचत गटा मधील महिला सदस्य यांचा प्राधान्याने समावेश असणे गरजेचे असून किमान ५० टक्के महिला असणे आवश्यक राहील.मजूर मित्र हा ग्राम पंचायतीचे सरपंच,ग्रामरोजगार सेवक यांचा जवळचा नातेवाईक नसावा.मेटला लिहिता व वाचता येण्यासोबतच बेरीज, वजाबाकी,गुणाकार व भागाकार या प्राथमिक गणितीय बाबींचे ज्ञान असावे.
निवड प्रक्रिया:-
एका कामाच्या ठिकाणी २० ते ४० मजूर उपस्थिती असल्यास देखरेख करण्यासाठी प्रत्येक २० कामगारांच्या मागे एक व ४१ ते ८० पर्यंत मजूर उपस्थिती असल्यास ४० च्यापुढील प्रत्येक १० मजूरा मागे एक या पटीने अतिरिक्त मजूरमित्र (मेट) यांची निवड करण्यात येणार आहे.ग्रामपंचायतीत एका सार्वजनिक कामावरील मजूरांची संख्या २० पेक्षा अधिक नसल्यास व ग्रामपंचायतीत सर्व सार्वजनिक कामे मिळून मजूरांची संख्या २० किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर अश्या गावात सुद्धा ‘मजूर मित्र’ची नियुक्ती करता येणार.सदर मजूर मित्र ज्या कामावरील सर्वात जास्त मजूर उपस्थिती असेल त्या कामावरील मस्टर वर नोंदवला जाईल.मात्र त्याचे काम त्या गावातील सर्व सार्वजनिक कामाची हजेरी NMMS व्दारे नोंदविण्याचे असेल.सर्व सार्वजनिक कामे मिळून ४० पेक्षा अधिक मजूर उपस्थिती असल्यास अधिक मजूर मित्र (मेट) नेमता येणार आहे.
मजूर मित्राच्या (मेट) कामाचे स्वरुप:-
मजूरांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांची माहिती देणे व त्यांना कामावर येण्यास प्रोत्साहित करणे.ग्रामपंचायतीतील सार्वजनिक कामांवरील मजूरांची हजेरी NMMS व्दारे नोंदविणे.मजूरांना पूर्ण मजूरी मिळण्यासाठी त्यांनी दिवसभरात करावयाच्या अपेक्षित कामाचे चिन्हांकन करणे,कामावरील मोजमापे घेण्यासाठी तांत्रिक सहाय्यक यांना मदत करणे,जॉबकार्डवरील माहिती वेळोवेळी अद्यावत करण्यासाठी ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवकांना मदत करणे,मजूरांकडून पुढील कामांसाठी कामाची मागणी ग्रामसेवक,ग्रामरोजगार सेवकाला अवगत करणे.मजूरांना पुढील आठवड्यातील नियोजित कामाबाबत माहिती देणे. जास्तीत जास्त मनुष्य दिन निर्मिती करण्यासाठी मजूर व कार्यान्वयीन यंत्रणा यांच्यामधील समन्वयक म्हणून कामकाज करणे इत्यादी.
मजूर मित्र (मेट) ची मजूरी:-
मजूर मित्र याची नोंद अकुशल मजूर म्हणून; हजेरीपत्रकातूनच मजूरी अदा करण्यात येणार आहे.