उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जिल्ह्यातीलधान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर आज ३० मार्च २०२३ रोजी प्रति हेक्टरी १५ हजार रुपये प्रमाणे रक्कम जमा झाली असल्याने शेतकरी बांधवांनी शिंदे सरकारचे आभार मानले आहे.
शेतकरी बांधवांच्या नशिबी नेहमी अवकाळी पाऊस,किडीचा प्रादुर्भाव,गारपीट,बँकांच्या कर्जाचे डोंगर,सततची नपिकी व इतर कारणांमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.अशातच मुख्यमंत्री शिंदे यांनी डिसेंबर २०२२ च्या हिवाळी अधिवेशनात शेतकरी बांधवांसाठी मोठी घोषणा केली होती.त्यावेळी धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १५ हजार रुपये प्रमाणे २ हेक्टर मर्यादे पर्यंत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.त्यानुसार आज जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यात प्रति हेक्टरी १५ हजार रुपये प्रमाणे रक्कम जमा करण्यात आली आहे.