- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार सुरू झाली आहे.अश्यातच काही ठिकाणी पावसामुळे जीवितहानीच्या दुर्घटनाही घडू लागल्याचे उघडकीस येऊ लागले आहे.अश्याच प्रकारे आज,शुक्रवार ३ जुलै रोजी दुपारच्या सुमारास नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव शहरात घराचा स्लॅब कोसळून आजी आणि नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.मालेगाव शहरातील कलेक्टर पट्टा परिसरात महारुद्र हनुमान मंदिराजवळ ही दुर्दैवी घटना घडली.
या दुर्घटनेत आजी विमलबाई पंढरीनाथ येवले वय ८० वर्षे आणि नातू चेतन रामचंद्र येवले वय २० वर्षे, रा.कलेक्टर पट्टा,मालेगाव,जि.नाशिक अशी मृतकांची नावे आहेत.
मालेगाव शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे.घटनेच्या वेळी म्हणजेच आज आजी आणि नातू दोघे घराच्या हॉलमध्ये बसले होते.यावेळी अचानक हॉलच्या भागाचा स्लॅब कोसळला.स्लॅब कोसळल्याने विमलबाई व चेतन हे दोघेही सिमेंट-काँक्रीटच्या मलब्याखाली दबल्या गेले.स्लॅब कोसळण्याचा आवाज होताच घराशेजारील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, स्थानिक प्रशासन आणि परिसरातील नागरिकांना तातडीने मदतकार्य सुरू केले.मलब्याखाली अडकलेल्या आजी आणि नातवाला बाहेर काढण्यात आले व रुग्णालयात हलविण्यात आले,पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.दुर्घटनेत दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
- Advertisement -

