उद्रेक न्युज वृत्त
मुनिश्वर बोरकर,गडचिरोली
गडचिरोली :- कुरखेडा तालुका मुख्यालयापासून १२ कि.मी.अंतरावरील मालेवाडा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय बांधुन सहा महिने लोटूनही उदघाटनाचा मुर्हत वन विभागाच्या कार्यालय प्रमुखांना सापडत नसल्याने सदर कार्यालय कुलूपबंद अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे.
मालेवाडा वनविभाग कार्यालयाचे बांधकाम गेल्या दोन वर्षापासुन सुरु होते.सदर बांधकामाची देखभाल आरमोरीचे वन परिक्षेत्र अधिकारी मेश्राम यांचेकडे होते.सुरवातीला थातूर-मातुर काम ठेकेदारामार्फत सुरू असल्याने कामाचा दर्जा व क्वॉलिटी पाहीजे त्या प्रमाणात नव्हती.रेतीची वाहतूक वैद्य की अवैध अशी शंका बळावली आहे.अश्याही परिस्थितीत गेल्या सहा महिण्यापूर्वी काम पुर्ण होऊन रंग,रंगोटी झाली असुन सदर कार्यालय कुलुपबंद अवस्थेत दिसून येत आहे.काही दिवसांपूर्वीच देलनवाडी वन परिक्षेत्र अधिकारी मेहर यांचेकडे अतिरिक्त पदभार आला असूनही आजतागायत इमारतीचे उदघाटन झालेले नसल्याने नागरिकांना व कर्मचाऱ्यांना आश्चर्यच वाटतो आहे.सदर बांधकाम झालेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी मालेवाडा कार्यालयाचे उद्घाटन लवकरात-लवकर करावे; अशी मागणी जोर धरू लागली आहे.