उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- अवैधदारू व तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यकमांतर्गत जिल्हा समन्वय जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारला बैठक पार पडली.बैठकीत दारू व तंबाखूमुक्त मार्कंडा यात्रेच्या मुक्तिपथने मांडलेला प्रस्तावास मान्यता देण्यात आली.मार्कंडा यात्रा दरवर्षी प्रमाणे यावर्षीही दारू व तंबाखूमुक्त साजरी होण्यावर भर देण्यात यावा.मुक्तिपथ अभियान,राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण चमू,अन्न औषध विभाग,पोलिस विभाग यांचे पथक निर्माण करून अवैध तंबाखू व दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई करावी.विभागाने शाळेच्या आजूबाजूला १०० मीटर अंतर्गत असलेले पानठेले हटवून शाळा परिसर तंबाखूमुक्त करण्यावर भर द्यावा व पुढील बैठकीत आकडेवारी सादर करावी.अशा सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी केल्या आहेत.चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त १८ फेब्रुवारीपासून भरणाऱ्या यात्रेत अवैधरित्या तंबाखू,दारूविक्री केल्यास कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी दिले असून सदर बैठकीदरम्यान बोलत होते.
बैठकीत संतोष सावळकर यांनी मागील २३ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीचा कार्यवृतांत व अनुपालन अहवाल याचे वाचन केले.बैठकीला मुक्तिपथचे संचालक तपोजेय मुखर्जी,उपसंचालक संतोष सावळकर,राज्य उत्पादन शुल्क विभाग अधीक्षका स्वाती काकडे,तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा समन्वयक स्वाती साठे,एलसीबी पथकाचे उल्हास भुसारी,अन्न औषध विभागाचे सुरेश तोरेम,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जठार, शिक्षणाधिकारी निकम,प्रतिनिधी गेडाम,राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे मीना दिवटे,राहुल कंकनालवार, दिनेश खोरगडे,राहुल चावरे,डॉ. मृणाली रामटेके, स्थानिक गुन्हे शाखेचे मंगेश राऊत,बीटपल्लीवार, पोलिस विभाग,आरोग्य,शिक्षण,जिल्हा माहिती अधिकारी आदी विविध विभागाचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते.