Sunday, October 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमान्सून सक्रिय; देशभरात जोरदार पावसाची शक्यता..

मान्सून सक्रिय; देशभरात जोरदार पावसाची शक्यता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-लांबच्या प्रवासावर असलेला पाऊस परत आल्याने अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा कहर सुरु आहे.झारखंडमध्ये चार तर बिहारमध्ये तीन महिलांचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाला असून दोन महिला भाजल्या आहेत.बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात उद्या,गुरुवार २४ जुलैपासून कमी दाबाचा नवीन पट्टा तयार होणार असून त्यामुळे देशभरात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आहे.पाटणा हवामान केंद्रानुसार सध्या बिहारमध्ये मान्सून कमजोर झाला असून पुढील ४८ तासांत पावसाची शक्यता नाही.जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले असून पुढील ७२ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिला आहे. काल मंगळवारी राजौरी जिल्ह्यात सैन्य कॅम्पची भिंत कोसळून तीन कारचे नुकसान झाले.वाराणसीत गंगेची पातळी घटत असून आज बुधवारी दरतास २ सेंटीमीटरने घट झाली आहे. सध्या गंगेची पातळी ६९.२४ मीटर आहे,पण अजूनही ८४ घाट पाण्याखाली आहेत.वरुणा भागात ३० हजार लोकसंख्या प्रभावित असून ४०० कुटुंबांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे.राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) टीम्सना वाराणसीतील पूरग्रस्त भागांमध्ये तैनात करण्यात आले आहे.कुणीही अडकलेला नसावा यासाठी सातत्याने गस्त घालण्यात येत आहे.मात्र,पावसाचा जोर कमी झाल्यामुळे गंगा आणि वरुणा या दोन्ही नद्यांच्या पाण्याची पातळी हळूहळू घटत आहे.आज बुधवारी जम्मू-काश्मीर,छत्तीसगड,महाराष्ट्र,गोवा,तेलंगणा,आसाम आणि मेघालयसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.हिमाचल प्रदेशात २६ जुलैपर्यंत पावसाची तीव्रता कमी राहील,त्यानंतर नवीन पावसाळी फेरी सुरु होण्याची शक्यता आहे.मध्य प्रदेशात मान्सून प्रणाली सक्रीय झाल्यामुळे आज मंगळवारी भोपाळ,इंदूर,तिकमगडसह २० जिल्ह्यांत मुसळधार पावसाची नोंद झाली.आजही जबलपूर,शेवपूर,मुरैना,नरसिंहपूर, छिंदवाडा, बालाघाट, डिंडोरी,अनूपपूर यासह १५ जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.सध्या राज्यात सरासरी २१ इंच पावसाची नोंद झाली असून ही प्रमाण अपेक्षित १३.७ इंचांपेक्षा ५३ टक्के अधिक आहे.ग्वाल्हेरसह काही जिल्ह्यांमध्ये ८० ते ९५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.छत्तीसगडमधील रायपूर,दुर्ग,बिलासपूर आणि बस्तरमध्ये चांगला पाऊस झाला असून ४५८.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे.हिमाचल प्रदेशातील शिमल्यात आज बुधवारी सकाळी धुक्यामुळे दृश्यता ५० मीटरपेक्षा कमी झाली.सतलज नदीवरील धरणातून पाणी सोडल्यामुळे पातळी ४-५ मीटर वाढू शकते.नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पंजाबमधील पठाणकोट,होशियारपूर,रूपनगर, मोहालीमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पठाणकोटमध्ये ५० मिमी आणि लुधियानात ३१ मिमी पावसाची नोंद झाली.एका पूलावरून कार वाहून गेली आणि महापौर बलजीत सिंह यांनी पाण्यात उडी घेऊन कुटुंबाला वाचवले.दिल्ली आणि एनसीआरमध्ये आज बुधवारी सकाळी जोरदार पावसामुळे वाहतूक कोंडी आणि पाणी साचल्याच्या घटना घडल्या.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!