Monday, August 24, 2026
Homeचामोर्शीमहिनाभरात वाघाने दोन बोकड केले ठार…-चामोर्शी वनक्षेत्रात वाघाची प्रचंड दहशत…

महिनाभरात वाघाने दोन बोकड केले ठार…-चामोर्शी वनक्षेत्रात वाघाची प्रचंड दहशत…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चामोर्शी(गडचिरोली) :- गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी वनक्षेत्रात मागील काही महिन्यांपासून वाघाची प्रचंड दहशत पसरली आहे.दिनांक -२ मे रोजी वाघाने वेलतूर तुकूम येथे बोकड ठार केल्याची घटना घडली होती.या घटनेनंतर एक महिन्याच्या कालावधीतच रविवारी,२ जून रोजी वाघाने याच परिसरातील नदी काठावरील शेतशिवारात हल्ला चढवित बोकड ठार केल्याची घटना घडली.महिनाभरात वाघाने दोन बोकड ठार केल्याने,या परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीत आहेत.चामोर्शी वनक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या वेलतूर तुकूम येथील सोमनाथ परशूराम मंगल या शेतकऱ्यांच्या शेळ्या रविवारी वैनगंगा नदी काठालगतच्या शेतशिवारात चराईसाठी गेल्या होत्या. दरम्यान वाघाने यातील एका बोकडावर हल्ला चढवून  ठार केले.यात त्यांचे १८ हजाराचे नुकसान झाले. घटनेची माहिती प्राप्त होताच वनपरिक्षेत्राधिकारी आर.बी.इनवते यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक गोवर्धन,वनरक्षक ए.एस. नैताम,पोलिस पाटील मुकुंदा सरकार,उपसरपंच दिंगाबर धानोरकर आदींनी घटनास्थळ गाठित पंचनामा केला.दरम्यान वनरक्षक नैताम यांनी काल,सोमवारी,दिनांक -३ जून रोजी घटनास्थळालगत लावलेल्या ट्रॅप कमेऱ्याची पाहणी केली असता; ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ कैद झाला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

शेतावर गेला ‘तो’ घरी परतलाच नाही; आज सापडला मृतदेह.. – कोंढाळा येथील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-शेतावर धानपिकाला खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी चक्क मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा...

देसाईगंज ठाणेदारांची सट्टा-पट्टी व्यवसायावर धाड; ११ जण गजाआड.. – दुचाकी वाहनांसह साहित्य नेले उचलून..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील विविध गावात सट्टा-पट्टी व्यवसायाला मोठे उधाण आल्याची बाब उघडकीस येताच नव्याने रुजु झालेले देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!