Wednesday, June 10, 2026
Homeगडचिरोलीमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली; परीक्षार्थींसाठी सुधारित वेळापत्रक..

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली; परीक्षार्थींसाठी सुधारित वेळापत्रक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा-टिईटी-२०२६ परीक्षा आता येत्या,रविवार २८ जून २०२६ रोजी होणार आहे.यापूर्वी ही परीक्षा २१ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती.मात्र,त्याच दिवशी नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत नीट परीक्षा देशभरातील विविध केंद्रांवर होणार असल्याने दोन्ही परीक्षांसाठी अनेक केंद्रे एकच येण्याची शक्यता लक्षात घेता महाटिईटी परीक्षेचे आयोजन पुढे ढकलण्यात आले आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षार्थींना प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढण्यासाठी १६ जून २०२६ ते २८ जून २०२६ हा कालावधी उपलब्ध राहणार आहे.शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक-१ रविवार,२८ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.०० या वेळेत होईल. तर पेपर क्रमांक २ याच दिवशी दुपारी २.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत घेण्यात येणार आहे.
सदर परीक्षेच्या वेळापत्रकात केवळ प्रशासकीय अडचणीमुळे बदल करण्यात आला असून इतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही.परीक्षार्थींनी अद्ययावत माहितीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळास नियमित भेट द्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!