- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मागील काही महिन्यांपासून जागतिक स्तरापासून ते देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे.याचा फटका सलून व ब्युटी पार्लर व्यवसायालाही बसला आहे.या व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.त्यातच जीएसटी,इन्कम टॅक्स,प्रोफेश्नल टॅक्स,दुकानांचे भाडे,वीजबील,कारागिरांचा पगार आदींसारख्या आर्थिक विवंचनेत सलून व्यावसायिक अडकला आहे.त्यामुळे दरवाढ करण्याची मागणी सलून व्यावसायिकांकडून करण्यात येत होती.सलून व्यवसायाशी निगडीत सर्वच घटकांमध्ये दरवाढ झाल्याने ग्राहकांना कमी दरात सेवा पुरवणे व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या परवडत नव्हते. परिणामी,महाराष्ट्र नाभिक महामंडळाने १ जानेवारी २०२५ पासून सलून व ब्युटी पार्लरच्या दरामध्ये २० ते ३० टक्के दर वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवाढीचा हा निर्णय राज्यातील शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातही लागू असणार आहे.त्यामुळे दाढी-कटिंगसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
- Advertisement -

