- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-विधानसभा निवडणुकीसाठी सर्वत्र महाराष्ट्र राज्यात उद्या,बुधवारी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतदान करतांना अनेक जण फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करतात.परंतु, निवडणूक विभाग असे फोटो काढणाऱ्यांचा बंदोबस्त करणार आहे.विशेष म्हणजे,मतदान केंद्र परिसरात मोबाइल बाळगण्यास मनाई असल्याने कोणीही मतदान केंद्रामध्ये मोबाइल बाळगू नये,असे निर्देश निवडणूक विभागाने दिले आहेत.
मतदान केंद्र असल्याच्या ठिकाणापासून २०० मीटर परिसरात मंडप,दुकाने उभारण्यास बंदी राहणार आहे. तसेच मोबाइल फोन,स्मार्ट फोन,कॉर्डलेस फोन,पेजर, वायरलेस सेट,ध्वनिक्षेपक व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
निवडणूक निरीक्षक,जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक कामकाजाकरिता नेमणुकीस असलेले मतदान केंद्र अधिकारी,सूक्ष्म निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी,अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी,पोलिस अधिकारी व मतदार यांच्याव्यतिरिक्त इतर व्यक्तींस प्रवेशाकरिता प्रतिबंध करण्यात आला आहे.या परिसरात खासगी वाहन आणण्यास किंवा संबंधित पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन करण्यासही मनाई आहे.
- Advertisement -

