Friday, July 31, 2026
Homeगडचिरोलीभामरागड तालुक्यातील एक तर धानोरा तालुक्यातील दोन नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण.. - तिघांवर...

भामरागड तालुक्यातील एक तर धानोरा तालुक्यातील दोन नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण.. – तिघांवर ३८ लाखांचे बक्षीस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील एक तर धानोरा तालुक्यातील दोन नक्षलवाद्यांनी आज,शुक्रवार १४ फेब्रुवारीला गडचिरोली पोलीस तथा केंद्रीय सुरक्षा दल (सिआरपीएफ)यांच्या समोर आत्मसमर्पण केले.विक्रम ऊर्फ मंगलसिंग ऊर्फ संदिप सहागु तुलावी वय ४० वर्षे रा.गुर्रेकसा,ता.धानोरा,जि. गडचिरोली,नीलाबाई ऊर्फ अनुसया बंडु ऊईके वय ५५ वर्षे,रा.मेडपल्ली,ता.भामरागड,जि.गडचिरोली व वसंती ऊर्फ सुरेखा ऊर्फ दुल्लो राजु हिडामी वय ३६ वर्षे,रा.गुर्रेकसा,ता.धानोरा,जि.गडचिरोली असे आत्मसमर्पण केलेल्या नक्षलींची नावे आहेत.शासनाने
तिघांवर ३८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.यामध्ये विक्रम ऊर्फ मंगलसिंग ऊर्फ संदिप सहागु तुलावी याच्यावर १६ लाख रुपये,नीलाबाई ऊर्फ अनुसया बंडु ऊईके हिच्यावर १६ लाख रुपये तर वसंती ऊर्फ सुरेखा ऊर्फ दुल्लो राजु हिडामी हिच्यावर ६ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
नक्षलवाद्यांवर सततच्या होणाऱ्या कारवायांमुळे तसेच नक्षली जीवन हे त्रासदायक झाल्याने आत्मसमर्पण केल्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात अनेक नक्षलवाद्यांनी स्वतः आत्मसमर्पण करून शैलीचे जीवन जगण्याचा मार्ग निवडला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सामाजिक वनीकरण विभागाचा विभागीय वन अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-तक्रारदारास तंबी देऊन तब्बल ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना बीड जिल्ह्याच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यास(DFO)छत्रपती संभाजीनगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

क्रिकेटपटू तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-क्रिकेटच्या मैदानावर मोठे नाव कमावण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या एका १७ वर्षीय क्रिकेटपटू तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना नागपूरच्या बजाजनगर पोलिस...

नव्या परिस्थितीनुसार आपत्ती व्यवस्थापनाची कार्यपद्धती विकसित करण्याची गरज.. -नदीकाठील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या-सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बदलत्या हवामानामुळे अल्प कालावधीत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश सहपालकमंत्री...

जिल्हा परिषदांसह मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार एकाचवेळी होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ५० टक्के ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या तब्बल २२ जिल्हा परिषदांच्या निवडणूका अद्यापही रखडल्या आहेत.विशेष म्हणजे,ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडल्या गेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!