उद्रेक न्युज वृत्त
ब्रम्हपुरी :- शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण विकासाचे खरे चित्र देशातील तेलंगाना राज्यात दिसुन येत आहेत.२४ तास चांगल्या दाबाची मोफत वीज आणि पाणी,प्रत्येक सिजनमध्ये पेरणीसाठी १० हजार रुपये मदत,शेळी पालनसाठी ७५% सब्सिडी,५ लाख रुपये किसान विमा,ट्रॅक्टर खरेदीसाठी ९५% सब्सिडी अशा विविध शेतकरी योजनांच्या आधारे तेलंगणातील शेतकरी बांधव सुखमय जीवन जगतांना दिसून येत आहेत.अशातच ब्रम्हपुरी विधानसभेतील शेतकरी बांधवांचा फायदा घेत आज पर्यंत फक्त राजकारण करण्यात आले आहे.ब्रम्हपुरी विधानसभेतील अनेक शेतकरी बांधव चिंताग्रस्त व अडचणींचा सामना करतांना दिसून येत आहेत.त्यामुळेच किसान क्रांतीचे वादळ निर्माण करण्यासाठी भारत राष्ट्र समितीचे संयोजक निहाल ढोरे,देवनंदन ठेंगरी,मायासिंग बावरी यांच्या नेतृत्वात ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात गुलाबी वादळ सुरु होत आहे.
शेतकऱ्यांचा पक्ष म्हणुन भारत राष्ट्र समितीला कमी वेळेत ब्रम्हपुरी विधानसभेत जनतेचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.भारत राष्ट्र समितीचे ब्रम्हपुरी विधानसभेत १० हजार सभासद नोंदणी करण्याचे ठरविले आहे.तसेच २०२४ मध्ये लोकसभा, विधानसभा,जिल्हा परिषद,पंचायत समिती निडणुकीसाठी सज्ज असल्याचे चित्र समोर येत आहे. भारत राष्ट्र समितीच्या प्रचारावर जोर वाढविला आहे.
भारत राष्ट्र समितीचे प्रचार यात्रेत संयोजक सत्यपाल गोठे,अजय शेंडे,प्रविन कुथे,सतिश बनकर,गणेश बागमारे अमीन शेख,सागर सहारे,दिपक नन्नावरे, रुपेश ठाकरे,समिरसिंग भुरानी,शुभम गेडाम,क्रिष्णा खरवडे,सतिश दर्वे,अरमान पठाण इत्यादी कार्यकर्ते सहभागी होते.

