Monday, May 18, 2026
Homeगडचिरोलीबोगस डॉक्टरकी भोवली; तीन वर्षाचा कारावास..!

बोगस डॉक्टरकी भोवली; तीन वर्षाचा कारावास..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून अनेकजण लोकांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत डॉक्टर असल्याचे भासवून चुकीचे उपचार करून मरणाच्या दारात सोडत असतांनाही आरोग्य विभाग मूंग गिळून गप्प बसले असल्याचे चित्र आहे.अश्यातच ज्यांना वैधक शास्त्रातील कुठलाही अनुभव नाही,असेही स्वतःला मोठे डॉक्टर समजून औषधे वाटप करून आयुर्वेदाचे डॉक्टर ॲलोपॅथी औषधांचा साठा बाळगू लागले आहेत.तर काहीजण डॉक्टर असल्याचा बनाव करतांना दिसून येतात. अश्याच प्रकारे गडचिरोली तालुक्याच्या जेप्रा गावातील ईश्वर मोहन मारबते यास बेकायदेशीररित्या ॲलोपॅथी औषधांचा साठा बाळगल्याचा आणि डॉक्टर असल्याचा बनाव केल्याचा ठपका ठेवत गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवत तीन वर्षाचा कारावास आणि १ लाख ७५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवार २९ जुलै रोजी निकाल जाहीर करीत संबंधितास कठोर शिक्षा ठोठावल्याने बोगस डॉक्टरांची आता खैर नसल्याने अश्यांचे धाबे दणाणले आहेत.गोपनीय माहिती तसेच तक्रारीच्या आधारे गडचिरोली अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने गडचिरोली तालुक्याच्या जेप्रा येथील ईश्वर मारबतेकडे धाड मारली होती.सदरची कारवाई गडचिरोलीचे औषधी सहाय्यक आयुक्त निरज लोहकरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली होती. त्यानुसार,ईश्वर मारबते याच्याकडे अवैधपणे ॲलोपॅथी औषधांचा साठा आढळून आला व तक्रारीच्या अनुषंगाने तो स्वतःच औषधोपचार करीत असल्याचे निष्पन्न झाले.न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून ईश्वर मारबते दोषी आढळला असता न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावत दंड ठोठावला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वऱ्हाडांवर काळाचा घाला; ट्रक आणि कंटेनरच्या भीषण अपघातात १३ जण ठार.

उद्रेक न्युज वृत्त :-साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडांवर काळाने झडप घातल्याची घटना आज, सोमवार १८ मे रोजी दुपारच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर घडली.ट्रक आणि कंटेनरच्या भीषण...

औषध विक्रेत्यांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; तालुकानिहाय संपर्क क्रमांक जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट या संघटनेने देशभरातील ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात येत्या,बुधवार २० मे २०२६ रोजी संपूर्ण भारतभर...

येत्या गुरुवारी भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा; आपली मते,तक्रारी व संबंधित बाबी थेट समितीसमोर मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नागरिकांच्या भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारींची दखल घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा येत्या,गुरुवार २१ मे २०२६ रोजी सकाळी ११...

वाढत्या महागाईचा परिणाम; आता एसटी बसच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ होत असतांना एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!