Thursday, April 16, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तबेरोजगार तसेच सेवानिवृत्त शिक्षकांची होणार १५ हजार रुपये मानधनावर नियुक्ती..

बेरोजगार तसेच सेवानिवृत्त शिक्षकांची होणार १५ हजार रुपये मानधनावर नियुक्ती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची पटसंख्या २० व २० पेक्षा कमी झालेल्या आहेत; अशा शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन नियमित शिक्षकांपैकी एका शिक्षकाला जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत समायोजित करून त्या जागेवर सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी.एड.,बी.एड.अर्हताधारक बेरोजगार शिक्षकांची १५ हजार रुपये मानधनावर नियुक्ती करण्याबाबतचा शासन निर्णय शिक्षक दिनी राज्याच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाने निर्गमित केला आहे.
१५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावयाच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षकांमधून नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही.अशा ठिकाणी हे पद रिक्त राहिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. राज्यात डी.एड.व बी.एड.अर्हताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनादेखील अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकांचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षकीय पदाचे विहित काम पूर्ण करणे जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील.या आशयाचे हमीपत्र घेण्यात येणार आहे.शाळेची पटसंख्या भविष्यात २० पेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्यात आलेले सेवानिवृत्त शिक्षक व डी.एड., बी.एड.अर्हताधारक कंत्राटी शिक्षणाची सेवा नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत राहील.नियमित शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकांची सेवा संपुष्टात करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी होईल अशा शाळांमध्ये कार्यरत दोन नियमित शिक्षकांपैकी एका शिक्षकाची जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत समुपदेशाने बदली करण्यात येणार आहे.त्यामुळे जिल्हा परिषद शाळेत असलेल्या शिक्षकांची कमतरता पूर्ण होऊन विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी मदतीचे ठरणार आहे.आता प्रशासनाच्या निर्णयाची वाट आहे.प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषद हे पात्र व इच्छुक उमेदवारांमधून आवेदन पत्र मागवून नियुक्त्ती आदेश देतील.या शिक्षकांना भविष्यात नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करता येणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या आज,गुरुवार १६ एप्रिल रोजी चंद्रपूर दौऱ्यावर असणार असून आज सकाळी अकरा वाजता...

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!