- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्याच्या जयनगर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत प्रभारी मुख्याध्यापक आणि विज्ञान शाखेच्या शिक्षिकेची ‘लव्ह स्टोरी’ चांगलीच रंगल्याने शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षण विभागाकडे तक्रार केली.तक्रारीनंतर चौकशी करून मुख्याध्यापक व शिक्षिकेची वेगवेगळ्या शाळेत तात्पुरती बदली करण्यात आली.हे प्रेमीयुगूल शिक्षक दूर झाले असले तरी ते एकाच तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सध्या सेवा देत आहेत.पालकांच्या तक्रारीची दखल घेत व प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या झळकताच शिक्षण विभागाने समितीमार्फत प्रकरणाची चौकशी केली. मात्र,समितीने तसेच शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशीचा अहवाल अजूनही उघड केला नाही. तक्रारीमुळे दोघांनाही पंचायत समितीस्तरावरून चामोर्शी तालुक्यातील विकासपल्ली व कुनघाडा माल येथे बदली करण्यात आली आहे.मुख्याध्यापकास विकासपल्ली तर विज्ञान शाखेच्या शिक्षिकेला कुनघाडा माल शाळेत तात्पुरत्या स्वरूपात बदली करण्यात आली आहे.यावर पालकांचे समाधान न झाल्याने शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थांच्या वतीने काल,मंगळवार २५ मार्च रोजी शाळेला कुलूप ठोकून शाळेसमोर धरणे आंदोलन केले.दोन्ही शिक्षकांना जोपर्यंत निलंबित करण्यात येत नाही,तोपर्यंत शाळेचे कुलूप काढण्यात येणार नाही, असा पावित्रा ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आला आहे.सदरच्या आंदोलनामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ माजली असून बिचाऱ्या मुख्याध्यापक आणि शिक्षिकेच्या लव्हस्टोरी प्रकरणी गावकरी हात धुवून मागे लागले असल्याचे बोलले जात आहे.
- Advertisement -